शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

ध्वनीकंपन लहरींद्वारे गोदापात्राचे सर्वेक्षण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 01:23 IST

गोदावरी नदीपात्रातील गाळ काढण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीने तयारी आरंभली असून, सध्या डिजिटल इको साउंड मशीनच्या सहाय्याने ध्वनीकंपन लहरींद्वारे (अल्ट्रासोनिक वेव्हज) द्वारे नदीपात्राचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.

नाशिक : गोदावरी नदीपात्रातील गाळ काढण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीने तयारी आरंभली असून, सध्या डिजिटल इको साउंड मशीनच्या सहाय्याने ध्वनीकंपन लहरींद्वारे (अल्ट्रासोनिक वेव्हज) द्वारे नदीपात्राचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.गोदावरी नदीपात्रातील गाळ हटविण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. विशेषत: महापालिकेने नदीपात्रावर पूल बांधताना तसेच गंगापूर पंपिंग स्टेशन येथून हनुमानवाडीकडे पाइपलाइन टाकताना नदीपात्रातील पाणी अडविण्यासाठी कॉफर डॅम बांधला होता. त्यावेळी सर्व माती गाळ नदीपात्रात ‘जैसे थे’ असून, तो काढण्याची गरज व्यक्त केली जात होती. स्मार्ट सिटी कंपनीच्या विविध कामांमध्ये नदीपात्रातील गाळ काढण्याचे कामदेखील अंतर्भूत आहे. त्याची सर्व प्राथमिक तयारी पूर्ण करण्यात आली असून, आता गेल्या महिन्यापासून काम सुरू झाले आहे. नदी काठावरील गवत आणि पानवेली काढण्यास यापूर्वीच प्रारंभ झाला आहे.प्रत्यक्ष नदीपात्रातील गाळ काढण्यासाठी मात्र सर्वेक्षण बाकी होते. नदीपात्रात डिजिटल इको साउंड मशीनच्या मदतीने ध्वनिकंपन लहरींद्वारे गोदारी नदी पात्राचे सर्वेक्षण सुरू असून, ते संपल्यानंतर फॉरेस्ट नर्सरी ते होळकर पुलाच्या दरम्यान नदीपात्रातील गाळ काढण्यात येणार आहे. त्यामुळे नदीपात्राची वहन क्षमता वाढणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिकgodavariगोदावरी