शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

गोदावरी, गिरणाच्या वाळू चोरीत महसूलचा संबंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 01:28 IST

सिन्नर तालुक्यातील सोमठाण येथे नदीच्या पात्रातून सुरू असलेल्या बेकायदा वाळू उपशाबाबत सोशल माध्यमातून जिवंत पुरावे व्हायरल होत असताना मालेगाव येथे पाण्याअभावी उजाड झालेल्या गिरणा नदीपात्रात दिवसाढवळ्या मालट्रकमधून वाळूची चोरी होत असल्याचे उघड झालेले असताना महसूलने डोळ्यावर बांधलेल्या पट्टीमुळे वाळूमाफियांचे चांगलेच फावले आहे.

नाशिक : सिन्नर तालुक्यातील सोमठाण येथे नदीच्या पात्रातून सुरू असलेल्या बेकायदा वाळू उपशाबाबत सोशल माध्यमातून जिवंत पुरावे व्हायरल होत असताना मालेगाव येथे पाण्याअभावी उजाड झालेल्या गिरणा नदीपात्रात दिवसाढवळ्या मालट्रकमधून वाळूची चोरी होत असल्याचे उघड झालेले असताना महसूलने डोळ्यावर बांधलेल्या पट्टीमुळे वाळूमाफियांचे चांगलेच फावले आहे. राजकीय वरदहस्ताने केल्या जात असलेल्या वाळू चोरीत आता  महसूल विभागालाही सहभागी  करून घेण्यात आले असून, त्यामुळेच तलाठी ते जिल्हाधिकारी अशा सर्वांनीच या प्रश्नी सोयीस्कर भूमिका घेतली  आहे.  सोमठाणे येथील वाळू उपशाबाबत अनेक संशयास्पद बाबी समोर आल्या असून, त्यातूनच महसूल विभागाचा या संपूर्ण प्रकरणातील सहभाग उघडकीस आला आहे.इतका साठा होत असताना तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार व प्रांत अधिकाऱ्यांना त्याची खबर लागू नये याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात असून, या वाळू साठ्याच्या लिलावाला अनुमती देणाºया जिल्हा प्रशासनालादेखील त्याबाबत संबंधितांना जाब विचारावासा वाटला नाही. महसूल विभागाची या संपूर्ण प्रकरणात संशयास्पद भूमिका असतानाच, सदरच्या साठ्याचा लिलाव सिन्नर तालुक्यातील सत्ताधारी पक्षाच्या एका माजी लोकप्रतिनिधीच्या नातेवाइकानेच घ्यावा ही बाबदेखील योगायोगच म्हणावी लागेल. सोमठाणच्या वाळू ठिय्यातून बेकायदेशीर वाळू उपसा केला जात असल्याची तक्रार होत असताना महसूल विभागाने त्याबाबत चुप्पी तर साधलीच, परंतु या वाळू ठिय्याकडे वक्रदृष्टी करून पाहणाºया वाळूमाफियांच्या गाड्या पकडून त्यांचा आवाज बंद करण्याचाही प्रयत्न केला आहे. त्यामुळे महसूल खात्याच्या सहमतीशिवाय सदरचा व्यवसाय होत नसल्याची होणारी चर्चा खरी ठरू लागली आहे. असाच प्रकार मालेगावच्या गिरणा नदीपात्रातही दिवसाढवळ्या दिसू लागला आहे. पाण्याअभावी कोरड्याठाक पडलेल्या गिरणा नदीवरील पुलालालागूनच वाळू उपसा करून एकामागोमाग ट्रक भरले जात आहेत. परंतु त्यावरही कारवाई करण्यात महसूल खात्याचे हात धजावलेले नाहीत. एकीकडे राजकीय वरदहस्तांना मोकळीक, दुसरीकडे आपल्याच खात्यातील काही अधिकाºयांवर मेहेरनजर दाखविणाºया जिल्हा प्रशासनाची भूमिकाच संशयाच्या भोवºयात सापडली आहे.गोदावरीला लागूनच असलेल्या सोमठाणे येथील उपसा ठिकाणी सुमारे दोन हजार ब्रासचा अनधिकृत साठा असल्याचा अहवाल सिन्नर तहसीलदाराने जिल्हा प्रशासनाला पाठवून त्याच्या जाहीर लिलावाची अनुमती मिळविली असली तरी, सुमारे दोन हजार ब्रास वाळू याठिकाणी कोणी व कशासाठी साठा करून ठेवला त्याचा खुलासा मात्र केलेला नाही.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयsandवाळू