शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

गोदावरीला पून्हा पूरसदृश्य स्थिती; रात्रीपर्यंत पाणी ओसरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 18:09 IST

गंगापूर धरणातून सुमारे ७ हजार २१५ तर आळंदीमधून ९६१क्युसेकचा विसर्ग गोदापात्रात सुरू आहे. शुक्रवारपर्यंत हा विसर्ग ४ हजाराच्या जवळपास होता. तसेच शहरातील भूमिगत गटारी, नालेदेखील अद्याप ओसंडून वाहत असल्याने गोदावरीच्या होळकर पूलाखालून सुमारे ११ हजार २१ क्युसेक पाणी रामकुंडातून पुढे प्रवाहित होते.

ठळक मुद्देशहरात सायंकाळपर्यंत ६.२ मिमी पाऊस गंगापूर धरणातून सुमारे ७ हजार २१५ क्युसेकचा विसर्ग

नाशिक : गेल्या रविवारी गोदावरीला महापूर आल्याने नाशिककरांना मोठा फटका बसला. या महापूरातून हळुहळु गोदाकाठ सावरू लागला असून शनिवारी (दि.१०) गोदावरीच्या पातळीत पून्हा वाढ झाल्याचे दिसून आले. गंगापूर, आळंदी या दोन्ही धरणांमधून सकाळपासून विसर्ग वाढविण्यात आल्याने गोदावरीला पूरसदृश्य स्थिती पहावयास मिळाली. सायंकाळी उशिरापर्यंत गोदावरीतील दुतोंड्या मारूतीची मुर्ती छातीपर्यंत बुडाली.गोदाकाठ महापूरानंतर सावरताना पहावयास मिळत आहे. महापूराच्या तीव्रतेनंतर त्याच्या खाणाखूणा गोदाकाठवर फे रफटका मारताना सहज नजरेस पडतात. २००८सालापेक्षाही अधिक भयंकर महापूर अनुभवल्याचे गोदाकाठावरील रहिवशांशी चर्चा केल्यावर लक्षात येते. गोदावरीवरील सर्वात लहान असलेला रामसेतूला पाणी शनिवारी दुपारी लागले होते. गंगापूर धरणातून सुमारे ७ हजार २१५ तर आळंदीमधून ९६१क्युसेकचा विसर्ग गोदापात्रात सुरू आहे.

पावसाची विश्रांती; बाजारपेठा गजबजल्याशनिवारी पावसाचे प्रमाण कमी झाले होते. पावसाने उघडीप दिल्यामुळे नाशिककरांना सुर्यदर्शनही घडले. शहरातील बाजारपेठाही गजबजल्या पहावयास मिळाल्या. अवघ्या दोन ते चार दिवसांवर बकरी ईद तसेच स्वातंत्र्यदिन, रक्षाबंधनाचे सण येऊन ठेपल्याने दुसऱ्या शनिवारच्या सुटीमुळे बाजारपेठेत नागरिकांची गर्दी उसळली होती. मेनरोड,शालिमार, शिवाजीरोड, दहीपूल, नेहरूचौक, पंचवटी, रविवार कारंजा या भागात वाहतूक कोंडीही निर्माण झाली होती.गंगापूर पाणलोट क्षेत्रातील पाऊस (मिमीमध्ये)गंगापूर -०७गौतमी - १२त्र्यंबक - ६२अंबोली - ०५

गंगापूर धरण समुहातील साठागंगापर ८९.५६ टक्के भरले असून धरणात ५ हजार ४२ दलघफूपर्यंत जलपातळी पोहचली आहे. तसेच गंगापूर धरण समुहातील काश्यपी ९६.८६ टक्के, गौतमी ९३.५२ टक्के इतके भरले आहे. काश्यपीमधून ८४४ तर गौतमीमधून ५७०क्युसेकपर्यंत विसर्ग सुरू आहे.

टॅग्स :Nashik Floodनाशिक पूरgodavariगोदावरीTapovanतपोवनRainपाऊस