शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

देव माझा विठू सावळा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 01:03 IST

भावभक्तीत तल्लीन होऊन भाविक विठू चरणी लीन झाले होते. शहरातील विठ्ठल मंदिरांमध्ये दिवसभर विठ्ठलाच्या भक्तीचा सोहळा सुरू होता.

ठळक मुद्देभाविक चरणी लीन : मंदिरांमध्ये विठू नामाचा गजर

नाशिक : देव माझा विठू सावळा,माळ त्याची माझिया गळा....विठू राहे पंढरपुरी, वैकुंठचे भूवरी,भीमेच्या काठी डुले भक्तीचा मळा....अशा भावभक्तीत तल्लीन होऊन भाविक विठू चरणी लीन झाले होते. शहरातील विठ्ठल मंदिरांमध्ये दिवसभर विठ्ठलाच्या भक्तीचा सोहळा सुरू होता. पहाटेपासूनच मंदिरांमधील घंटानाद आणि मंत्रघोषाने आषाढी एकादशीची पहाट उगवली. भावभक्तिगीते आणि भजनात तल्लीन झालेल्या भाविकांनी विठूरायाचे नामस्मरण करीत दर्शनासाठी मंदिरांमध्ये गर्दी केली होती. शहरातील कापड बाजार, काझीपुरा, कॉलेजरोडवरील नामदेव विठ्ठल मंदिर, वडाळारोडवरील मंदिर, देवळाली गाव तसेच विहितगाव, पंचवटी आदी परिसरातील मंदिरांमध्ये विठू माउलीचे साजिरे सुंदर रूप सजले होते.आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांनी सजविलेले प्रवेशद्वार, भक्तिगीतांचे सूर आणि भाविकांच्या गर्दीने सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. शहर परिसर तसेच उपनगरांमध्येही विठ्ठल मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी दिसून आली. भाविकांना दर्शनाचा लाभ घेता यावा यासाठी मंदिरात रांगेत जाण्यासाठी बॅरिकेडिंग करण्यात आले होते, तर काही मंदिरांच्या परिसरात पोलीस बंदोबस्तदेखील तैनात करण्यात आला होता. भाविकांना सावध राहण्याच्या सूचना तसेच महिलांना दागिने सांभाळाच्या सूचना पोलीस आणि मंदिर प्रशासनाकडून देण्यात येत होत्या. उपवासाच्या पदार्थ्यांचा प्रसाद भाविकांना दिला जात होता. काही मंदिरांमध्येच्या ठिकाणी रक्तदान शिबिरांचेदेखील आयोजन करण्यात आले होते.उपवासाची खिचडी आणि लाडूआषाढीच्या दिवशी उपवास करणाऱ्यांची संख्या मोठी असते त्यामुळे आज सर्वत्र उपवासाच्या पदार्थांचेच स्टॉल्स दिसत होते. सकाळी विविध पदार्थांचा नाश्ता बनविणाºया स्टॉल्सवरदेखील उपवासाचेच पदार्थ तयार करण्यात आले होते. मंदिरांमध्येदेखील केळी आणि राजगिरा लाडूचा प्रसाद देण्यात आला. काही ठिकाणी साबुदाणा खिचडी प्रसाद म्हणून वाटप करण्यात आली.तर रक्तपेढीच्या वतीनेदेखील शिबिर लावण्यात आलेले होते. आषाढी एकादशीचा मुहूर्त साधत शहर जिल्ह्यातील भाविकांनी गोदाकाठी स्नानाची पर्वणीही साधली.

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम