शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘युद्धाचा देव’गरजला; देवळालीत स्कुल ऑफ आर्टिलरीचे शक्तीप्रदर्शन....!

By अझहर शेख | Updated: January 21, 2025 17:59 IST

भारतीय सैन्यदलाच्या पाठीचा कणा असलेल्या तोफखान्याचे शक्तीप्रदर्शनाने शत्रूच्याही उरात धडकी भरविली.

 नाशिक : युद्धाचा देव मानल्या जाणाऱ्या तोफखान्यातील अत्याधुनिक तोफांमधून गनर्सकडून दागण्यात आलेले बॉम्बगोळे अन् अचूक लक्ष्यभेदाने नाशिकच्या देवळाली येथील स्कुल ऑफ आर्टिलरीच्या शिंगवे बहुला फायरिंग रेंज मंगळवारी (दि.२१) दणाणली. भारतीय सैन्यदलाच्या पाठीचा कणा असलेल्या तोफखान्याचे शक्तीप्रदर्शनाने शत्रूच्याही उरात धडकी भरविली.

धनुष, बोफोर्स (१५५एमएम), के-९वज्र, अल्ट्रा लाइट होवित्झर (एम७७७), सॉल्टम, १५०एमएम लाइट फिल्ड गन, १३० एम.एम मिडियम गनसह मल्टी बॅरेल ग्रॅड बीएम रॉकेट लाँचरद्वारे अवघ्या १२सेकंदात एकापाठोपाठ एक सोडण्यात आलेल्या मिसाइलने लक्ष्य उद्ध्वस्त केले. निमित्त होते, देवळाली कॅम्प येथे स्कुल ऑफ आर्टिलरीच्या वतीने मंगळवारी (दि.२१) युद्ध सराव अभ्यास प्रात्याक्षिकाचे (तोपची) सादरीकरण करण्यात आले. या प्रात्याक्षिक सोहळ्याचे नेतृत्व स्कूल ऑफ आर्टिलरीचे कमाडंट व रेजिमेंट ऑफ आर्टिलरीचे वरिष्ठ कर्नल कमाडंट अति विशिष्ट सेवा मेडल, विशिष्ट सेवा मेडल लेफ्टनंट नवनित सिंग सरना यांनी केले. यावेळी विशेष अतिथी म्हणून नेपाळ सैन्य दलाचे ब्रिगेडियर मनोज थापा यांच्यासह अन्य लष्करी अधिकारी उपस्थित होते.

स्वदेशी, विदेशी बनावटीच्या अत्याधुनिक तोफांच्या अचूक माऱ्याने स्कुल ऑफ आर्टिलरीच्या गनरकडून पुन्हा एकदा स्वत:ची क्षमता सिद्ध करून दाखविली. अवघ्या काही सेकंदात निश्चित केलेले ‘लक्ष्य’ बॉम्ब हल्ल्याने उद्ध्वस्त केले, यावेळी तोफांच्या मारक क्षमतांचा प्रत्यय उपस्थितांना हादरवून सोडणारा होता. जवानांच्या कुटुंबीयांकडून यावेळी टाळ्यांचा कडकडाट करण्यात आला. नेपाळसह अन्य मित्र राष्ट्रांचे सैनिकदेखील डोळ्यांची पारणे फेडणाऱ्या अशा या अद्भूत सोहळ्याचे साक्षीदार ठरले. सोहळ्याचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला. नऊ तोफांसह रॉकेट लॉन्चरकडून ‘टार्गेट’ नेस्तनाबूत 

कोनहिल टॉप, हाथीमाथा, बहुला-१, बहुला-२, माउंड, हर्बरा, टेम्पल, ओपन पॅच, वॉल, व्ही-कट, हम्प, सगमाथा अशी नावे फायरिंग रेंजमधील सह्याद्री पर्वतरांगेतील डोंगरांवरील टार्गेटला देण्यात आलेली होती. प्रत्येक तोफांसाठी वेगवेगगळे लक्ष्य निश्चित केलेले होत. हे सर्व लक्ष्य तोफांनी अचूकरित्या भेदून नेस्तनाबूत केले.