शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
3
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
4
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
7
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
8
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
9
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
10
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
11
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
12
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
13
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
14
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
15
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
16
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
17
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
18
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
19
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
20
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप

देवही असुरक्षित; चोरट्यांचा आता मंदिरांवर डोळा

By admin | Updated: November 23, 2015 00:09 IST

चोरट्यांचा धोका : शहरातील विविध मंदिरांत दोन दिवसांत तीन घटना

नाशिक : कुंभनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक शहराच्या विविध भागांमध्ये पौराणिक काळातील मंदिरे असून या मंदिरांना चोरट्यांचा धोका निर्माण झाला आहे. नागरिकांच्या घरांबरोबरच देव-देवतांची घरेही चोरट्यांच्या रडारवर आली आहेत. काही दिवसांमध्ये घडलेल्या घटनांवरून ही बाब स्पष्ट होत असून पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेबाबत अधिक ‘दक्ष’ राहण्याची गरज असल्याची मागणी होत आहे.शहरात चोरट्यांकडून नागरिकांच्या घरांबरोबरच देवांची घरेही ‘टार्गेट’ केली जात असल्याने नाशिककरांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना पोलीस प्रशासनाचा धाकच राहिला नसल्याचे विविध घटनांमधून प्रकर्षाने जाणवत आहे. पंचवटी, आडगाव, गंगापूररोड, उपनगर, नाशिकरोड, इंदिरानगर अशा सर्वच भागांमध्ये घरफोड्यांसह मंदिरांमधील लुटीच्या घटना सातत्याने घडत असूनदेखील चोरटे पोलिसांच्या हाती लागत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शनिवारी (दि. २१) पहाटेच्या सुमारास रामकुंडावरील पुरोहित संघाचे अतिप्राचिन गंगागोदावरी मंदिराला चोरट्यांनी लक्ष्य केले. या मंदिराचे कुलूप तोडून देवीच्या मूर्तीवरील सोन्याच्या दागदागिन्यांसह पूजेचे साहित्य ओरबाडत दोन्ही दानपेट्याही फोडल्या आणि त्यामधील भाविकांनी मोठ्या श्रद्धेने टाकलेले ‘दान’ रोख रक्कमही हातोहात लंपास केल्याचे उघडकीस आले आहे. याचवेळी शेजारी असलेले स्वयंभू बाणेश्वर मंदिराचेही चोरट्यांनी कुलूप तोडून दानपेटीमधील रक्कम पळविली. विशेष म्हणजे हे सर्व घडत असताना हाकेच्या अंतरावर असलेल्या कपालेश्वर पोलीस चौकीमधील एकाही कर्मचाऱ्याला किंवा पंचवटीच्या गस्त पथकाला याबाबत सुगावा लागला नाही हे विशेष! ही घटना ताजी असताना आडगावच्या ग्रामदेवता असलेल्या महालक्ष्मी देवीची मूर्तीही चोरट्यांनी शनिवारी मध्यरात्री चोरून नेण्याचा प्रताप केला. पंधरवड्यापूर्वीच श्रीकृष्णनगरमधील कृष्णमंदिराची दानपेटीही चोरट्यांनी फोडल्याचे उघडकीस आले होते. पाइपलाइनरोडवरील दोन मंदिरेही चोरट्यांनी दहा दिवसांपूर्वी लक्ष्य केली होती. या गुन्ह्यांमधील संशयित शोधण्यास पोलिसांना यश आले आहे. (प्रतिनिधी)