शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

मतदानाचा टक्का वाढविणे हेच उद्दिष्ट : आनंदकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 12:28 AM

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मतदारयादी अधिकाधिक पारदर्शक आणि दोषविरहित असावी, यासाठी गेल्या महिनाभरापासून सुरू केलेल्या मोहिमेत अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत. जिल्ह्यातील या कामात जनतेचाही सहभाग वाढला आहे. निवडणुकीच्या या कामाविषयी उपजिल्हाधिकारी निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांच्याशी साधलेला संवाद...

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मतदारयादी अधिकाधिक पारदर्शक आणि दोषविरहित असावी, यासाठी गेल्या महिनाभरापासून सुरू केलेल्या मोहिमेत अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत. जिल्ह्यातील या कामात जनतेचाही सहभाग वाढला आहे. निवडणुकीच्या या कामाविषयी उपजिल्हाधिकारी निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांच्याशी साधलेला संवाद...नाशिक : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९साठी मतदार याद्यांचे शुद्धीकरण आणि मतदारयाद्या दोषविरहित करण्याची प्रक्रिया संपूर्ण जिल्ह्यात सध्या सुरू आहे. गेल्या महिनाभराच्या या मोहिमेत मतदानाविषयी प्रचंड जागरूकता निर्माण झाली असून, लोकसहभागही वाढला आहे. दररोज जिल्ह्यात मतदानाविषयीच्या होणाऱ्या मोहिमेतून मतदारही दक्ष झाला आहे. सदर मोहीम ३० जुलैपर्यंत सुरू राहणार आहे.प्रश्न : मतदार जनजागृतीसाठी सुरू केलेल्या निवडणूक शाखेच्या मोहिमेविषयी काय सांगाल?आनंदकर : लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर मतदानाची टक्केवारी पाहता जिल्हा प्रशासनाने मतदार यादीच्या शुद्धीकरणाची मोहीम लगेचच हाती घेतली. यामध्ये प्रामुख्याने यादीतील मयत आणि दुबार नावे वगळणे, दुरुस्ती करणे, चुका दुरुस्त करणे, यादीसंदर्भात असलेल्या तक्रारींचा निपटारा करणे आणि यादी अधिकाधिक दोषविरहित आणि परिपूर्ण करण्याकडे भर देण्यात आला. १ जानेवारी २०१९ च्या अर्हता दिनांकावर पात्र असलेल्या सर्व मतदारांची मतदार म्हणून मतदार यादीत नोंद करणे आणि विधानसभेत मतदानाची टक्केवारी कशी वाढू शकेल, यासाठी अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. ही मोहीम फलद्रूप होताना दिसते.प्रश्न : मोहिमेत मतदारांकडून मिळणारा प्रतिसाद कसा आहे?आनंदकर : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मागील ५२ वर्षांतील सर्वाधिक मतदान टक्केवारीची नोंद झाली, परंतु यावरही जिल्हा निवडणूक प्रशासन समाधानी नाही. मतदानाची टक्केवारी आणखी वाढविण्यासाठी निवडणूक शाखेने अनेक उपक्रम हाती घेतले. या उपक्रमात सर्व प्रशासकीय यंत्रणा व जिल्ह्यातील नागरिकांचे उत्तम सहकार्य लाभत आहे.प्रश्न : मतदारयादी शुद्धीकरणात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नाशिकची कामगिरी कशी आहे?आनंदकर : राज्यातील ३६ जिल्ह्यांचा विचार करता नाशिक जिल्हा हा निश्चितच अग्रेसर आहे. नाशिक जिल्हा हा निवडणूक कामाच्या व्यापकतेच्या दृष्टीने राज्यातील चौथ्या क्रमांकाचा मोठा जिल्हा आहे. महानगरीय किंवा नागरी लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यांमध्ये नाशिकचा क्रमांक वरचा आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मतदारयादी व एकंदर निवडणूक संचलनामध्ये नाशिक जिल्हा वरच्या क्रमांकावर आहे.प्रश्न : या मोहिमेचे निवडणूक शाखेने कसे नियोजन केले आहे?आनंदकर : जिल्हा निवडणूक शाखेने जिल्ह्यातील सर्व उपजिल्हाधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्यासह नायब तहसीलदार आणि मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामध्ये या मोहिमेविषयी जागृती करण्यात येऊन त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. निवडणूक कर्मचाऱ्यांना कामाचे प्राधान्यक्रम ठरवून देण्यात आलेले आहे. निवडणूक कामाची आवड असणारे नागरिक आणि विद्यार्थीही या कामात जोडले जात आहेत.प्रश्न : या मोहिमेत मतदारयाद्या किती प्रमाणात पारदर्शक होऊ शकतील, असे वाटते?आनंदकर : नाशिक जिल्ह्याची लोकसंख्या आजमितीस जवळपास ६५ लाख एवढी असून, मतदारांची संख्या ४५ लाखांपेक्षा अधिक आहे. लोकसंख्या व मतदारांचा विचार करता नाशिक जिल्हा जगातील १००पेक्षा जास्त देशांपेक्षा मोठा आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या जिल्ह्यात मतदार याद्यांचे शुद्धीकरण करणे खरोखरीच मोठे आव्हान आहे. तरीसुद्धा जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून राबविण्यात आलेल्या मोहिमेमुळे मतदारयादी अधिकाधिक परिपूर्ण होत आहे.प्रश्नावलीचा उपक्रमजिल्ह्यातील जवळपास २५ ते ३० लाख मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी जवळपास सात लाख विद्यार्थ्यांची मदत घेतली जात आहे. या विद्यार्थ्यांमार्फत एक प्रश्नावली मतदारांपर्यंत पोहोचविली जात आहे. मतदान विषयक जागरूकता निर्माण करणाºया या प्रश्नाने यादी शुद्धीकरणाला अधिक चालना मिळतेय.निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात निवडणूक कर्मचाºयांच्या माध्यमातून जनजागृती मोहीम सुरू आहे. या मोहिमेत मतदान कर्मचाºयांना प्रोत्साहन देण्याची संकल्पना या मोहिमेला बळ देणारी ठरली आहे. लोकसभा निवडणुकीत ज्या मतदान केंद्रांवर चांगले मतदान झाले त्या कर्मचाºयांना गौरविण्यात आले. विधानसभेसाठीही कर्मचाºयांना प्रोत्साहित केले जात आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकVotingमतदानvidhan sabhaविधानसभा