शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

व्यावसायिकांवरही येणार गंडांतर

By संजय पाठक | Updated: July 13, 2019 01:11 IST

शहरात स्मार्ट पार्किंग करताना अनेक ठिकाणी व्यापारी संकुले आणि दुकानांसमोरील जागा निवडण्यात आल्या असून, त्यामुळे अनेक संकुलांच्या फ्रंट मार्जीनवरच गंडांतर आले आहे. महत्त्वाचे म्हणजे शहरातील मॉलमध्ये येणाऱ्या ग्राहकांना फ्री पार्किंग देण्याची सक्ती करताना दुसरीकडे मात्र या व्यापारी संकुलात येणाऱ्यांना मात्र नाहक स्मार्ट पार्किंगच्या शुल्कापोटी दंड भरावा लागणार आहे.

ठळक मुद्देवाहनतळामुळे व्यवसायही अडचणीत : नगररचनाची संमती न घेताच परस्पर कारवाई

नाशिक : शहरात स्मार्ट पार्किंग करताना अनेक ठिकाणी व्यापारी संकुले आणि दुकानांसमोरील जागा निवडण्यात आल्या असून, त्यामुळे अनेक संकुलांच्या फ्रंट मार्जीनवरच गंडांतर आले आहे. महत्त्वाचे म्हणजे शहरातील मॉलमध्ये येणाऱ्या ग्राहकांना फ्री पार्किंग देण्याची सक्ती करताना दुसरीकडे मात्र या व्यापारी संकुलात येणाऱ्यांना मात्र नाहक स्मार्ट पार्किंगच्या शुल्कापोटी दंड भरावा लागणार आहे. त्यातच अनेक ठिकाणी तर सशुल्क पार्किंगमुळे तर ग्राहक अशा दुकानदारांकडे पाठ फिरवेल अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.महापालिकेच्या स्मार्ट सिटी कंपनीने २८ ठिकाणी स्मार्ट पार्किंग सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, त्यातील १३ ठिकाणी कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. मात्र असे करताना कंपनीने केवळ मोबीलीटी सेलच्या माध्यमातून पोलिसांना जागा दाखवून ना हरकत दाखला घेतला आहे. प्रत्यक्षात त्यामुळे काय अडचणी येतील हे कंपनीने ना पोलिसांनी तपासले आहे. महत्त्वाचे म्हणजे अशाप्रकारची कार्यवाही करताना कंपनीने अशा जागांना प्रथम महापालिकेच्या नगररचना विभागाकडून ना हरकत दाखला घेणे आवश्यक होते तसे न केल्याने अनेक ठिकाणी दुकाने किंवा व्यापारी संकुलांसमोरच स्मार्ट पार्किंग थाटली आहेत. या दुकानांचे फ्रंट मार्जीनवर त्यामुळे गंडांतर आले आहे, ते कायद्याला कितपत धरून आहे, हादेखील प्रश्न आहे. कोणत्याही मिश्र किंवा व्यापारी संकुलातील दुकानांसाठी त्याच्या दुकानासमोरील जागा वाहनतळासाठीच ठेवावी लागते.नागरिकांना भुर्दंड, कंपनीचा वाढणार धंदास्मार्ट सिटी कंपनीने अनेक चुकीच्या जागा निवडल्याचे दिसत असून, आता व्यावसायिकदेखील त्यास विरोध करू लागले आहेत. पंचवटी कारंजा येथे रस्त्यावर प्रस्तावित स्मार्ट पार्किंगला विरोध झाला. अर्थात, त्यानंतरही कंपनीने अनेक रहदारी किंवा जेथे लोकांना विविध कामांसाठी जावे लागते, अशा ठिकाणांची निवड केली असून, त्यामुळेदेखील नागरिकांना भुर्दंड बसणार आहे. नेहरू उद्यानाच्या समोर नामको बॅँक आहे किंवा खडकाळी सिग्नलजवळ जिल्हा परिषदेच्या बाहेर वाहनांची गर्दी असते. तेच स्मार्ट पार्किंग सुरू केल्याने कंपनीचा धंदा वाढणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSmart Cityस्मार्ट सिटी