नाशिक : महानगरपालिकेच्या वतीने माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी पुण्यतिथी व राष्ट्रीय संकल्प दिवस तसेच सरदार वल्लभभाई पटेल जयंती व राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शालिमार येथील श्रीमती इंदिरा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे इंदिरा गांधी व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त शपथ घेण्यात आली. कार्यक्रमास स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, सभागृहनेते दिनकर पाटील, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, प्रभाग सभापती डॉ. हेमलता पाटील, शाहीन मिर्झा, अतिरिक्त आयुक्त रमेश पवार, किशोर बोर्डे, उपआयुक्त हरिभाऊ फडोळ, आर. एम. बहिरम, रोहिदास दोरकुळकर, शहर अभियंता यू. बी. पवार, मुख्य लेखाधिकारी सुभाष भोर, मुख्य लेखापरीक्षक महेश बच्छाव, कार्यकारी अभियंता उदय धर्माधिकारी, देवेंद्र वनमाळी, जनसंपर्कअधिकारी यशवंत ओगले आदींसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
इंदिरा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल यांना महापालिकेतर्फे अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 00:08 IST