शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

येशू जन्म गौरव प्रार्थनेने गजबजले चर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 01:06 IST

प्रभू येशू ख्रिस्त यांचा जन्मोत्सव ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला शहरातील विविध चर्चमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. ख्रिस्त यांच्या जन्माच्या गौरव प्रार्थनेसाठी मोठ्या संख्येने समाजबांधव शहरातील होली क्रॉस, संत आंद्रिया, संत थॉमस चर्चमध्ये जमले होते.

नाशिक : प्रभू येशू ख्रिस्त यांचा जन्मोत्सव ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला शहरातील विविध चर्चमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. ख्रिस्त यांच्या जन्माच्या गौरव प्रार्थनेसाठी मोठ्या संख्येने समाजबांधव शहरातील होली क्रॉस, संत आंद्रिया, संत थॉमस चर्चमध्ये जमले होते. आकर्षक सजावट व रोषणाईने चर्चचा परिसर उजळून निघाला होता. ख्रिसमसचा सण शहरात ख्रिस्ती समाजबांधवांकडून उत्साहात साजरा केला जात आहे. यानिमित्त विद्युत रोषणाईसह आकर्षक सजावटीने शहरांमधील चर्चचे रूप पालटले आहे.होली क्रॉस चर्चमध्ये सोमवारी (दि.२४) रात्री नऊ वाजता धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ करण्यात आला. फादर लॉईड, वेन्सी डिमेलो यांच्या मार्गदर्शनाखाली नाताळ गीतांचा (कॅरोल) कार्यक्रम पार पडला. यानंतर प्रभू येशूचा जन्म सोहळा द्विभाषिक ‘मिस्सा’ प्रार्थना मराठी आणि इंग्रजी भाषेतून पठण करण्यात आली. तसेच मंगळवारी विविध धार्मिक कार्यक्रम सकाळपासून सुरू होणार असल्याची माहिती डिमेलो यांनी दिली. बाळ येशूच्या दर्शनासाठी दिवसभर चर्च खुले राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच संध्याकाळी सर्वधर्मीयांसोबत नाताळ सण साजरा केला जाणार आहे. दरम्यान, संत आंद्रिया चर्चमध्ये धर्मगुरू रेव्हरन्ट अनंत आपटे यांच्या मार्गदर्शनाखाली ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. ‘मिस्सा’ पठण करण्यासाठी समाजबांधवांची रात्री दहा वाजता चर्चमध्ये गर्दी लोटली होती. समाजबांधवांनी सामूहिकरीत्या प्रभू येशूची उपासना करत जन्मोत्सव साजरा केला.  तसेच शालिमार येथील सेंट थॉमस चर्चमध्ये फादर अरुण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. चर्चमध्ये संध्याकाळी धार्मिक प्रार्थना व भक्तीसाठी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.  चर्च परिसरात आकर्षक प्रभू येशूच्या जन्मोत्सवाचा देखावा साकारण्यात आला होता. तसेच आकर्षक रोषणाई करण्यात आल्याने परिसराचे रूपडे पालटले होते.होली होली लॉर्ड गॉड...होली होली लॉर्ड गॉड..., जगपापहारका परमेश कोंकरा, सोडी दयाधारा आम्हावरी प्रभूवरा..., तेरा हो अभिषेक अमन के राजकुमार.., बेथलेहम शहरी, दाविद नगरी जन्मास आले येशू बाळ... अशा विविध नाताळ गीतांनी (कॅरोल) होली क्रॉस चर्च दुमदुमले होते. यावेळी मोठ्या संख्येने समाजबांधवांनी उपस्थित राहून नाताळ गीतांचे गायन केले. तसेच सामूहिक प्रार्थना करतएकमेकांना येशू जन्मोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

टॅग्स :ChristmasनाताळNashikनाशिक