शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ कर्मचाऱ्यांना हलगर्जीपणाबद्दल नोटीस द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 00:18 IST

जुन्या नाशिकमधील कथडा येथील झाकीर हुसेन रुग्णालयात प्रसूतीदरम्यान झालेल्या हलगर्जीपणाबद्दल रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना चुकीची वागणूक देणा-यांना नोटीस बजावावी तसेच रुग्णांशी सभ्य वर्तवणूक करण्याची तंबी द्यावी, अशी मागणी वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समितीने केली आहे.

नाशिक : जुन्या नाशिकमधील कथडा येथील झाकीर हुसेन रुग्णालयात प्रसूतीदरम्यान झालेल्या हलगर्जीपणाबद्दल रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना चुकीची वागणूक देणा-यांना नोटीस बजावावी तसेच रुग्णांशी सभ्य वर्तवणूक करण्याची तंबी द्यावी, अशी मागणी वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समितीने केली आहे. यासंदर्भात महापालिकेच्या वैद्यकीय अधीक्षकांना पत्र देऊन समितीने या रुग्णालयात केलेल्या तपासणीत आढळलेल्या बाबींचा तपशील दिला आहे.  वडाळा येथील एका महिलेची झाकीर हुसेन रुग्णालयात प्रसूती झाली. परंतु फरशीवर तिची प्रसूती करण्यात आली. शिवाय संबंधित बालकास खासगी रुग्णालयात नेल्यानंतर ते दगावल्याने संबंधित महिलेने व त्यांच्या कुटुंबीयांनी या रुग्णालयातील कर्मचाºयांच्या विरोधात तक्रार केली होती. यासंदर्भात समितीचे सदस्य तसेच पूर्व प्रभाग समिती सभापती आणि अन्य सहकाºयांनी रुग्णालयास भेट देऊन माहिती घेतली. तक्रारदार महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने शहानिशा करण्यात आली. त्या महिलेची फरशीवर प्रसूती करण्याच्या प्रसंगातील अपरिहार्यता लक्षात घेऊन त्यासंदर्भात संबंधित कर्मचाºयास क्लिन चीट दिली आहे. मात्र रुग्णालयाचील कर्मचारी रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांशी व्यवस्थित वागत नाही, अरेरावीने बोलतात तसेच सौजन्यपूर्वक वागत नसल्याने महापालिकेच्या रुग्णालयांविषयी जनमाणसात गैरसमज पसरत असल्याने त्यांना चांगल्या वर्तवणुकीसाठी प्रवृत्त करणे गरजेचे आहे. त्या पार्श्वभूमीवर संबंधिताना नोटिसा बजावाव्या, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.  दरम्यान, रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून संबंधितांनी काम करावे, यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचे शिबिर घेऊन कर्मचाºयांंना प्रशिक्षित व सुसंस्कृत करावे, अशी सूचना चौकशी समितीच्या सदस्य पल्लवी पाटील, नयना गांगुर्डे, शोभा साबळे, समिना मेमन, रूची कुंभारकर, संतोष गायकवाड यांनी केली आहे.क्लिन चीट : रुग्णांच्या नातेवाइकांना अरेरावीत्या महिलेची फरशीवर प्रसूती करण्याच्या प्रसंगातील अपरिहार्यता लक्षात घेऊन त्यासंदर्भात संबंधित कर्मचाºयास क्लिन चीट दिली आहे. मात्र रुग्णालयाचील कर्मचारी रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांशी व्यवस्थित वागत नसल्याच्या तक्रारी यावेळी समोर आल्या. रुग्णालयात येणाºया रुग्णांप्रमाणेच इतरांनादेखील अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याची तक्रार केली जात आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाhospitalहॉस्पिटल