शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
3
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
4
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
5
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
6
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
7
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
8
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
11
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
12
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
13
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
14
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
15
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
16
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
17
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
18
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
19
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
20
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर

कांदा उत्पादकांना पाचशे कोटींचे पॅकेज द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 23:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कळवण : एकीकडे कांदा भावात झालेली घसरण, तर दुसरीकडे कष्ट करून पिकवलेला कांदा चाळीतच सडत असल्याने ...

ठळक मुद्देशेतकरी संघटनेची मागणी : कळवण बाजार समितीस भेट, दरात घसरण

लोकमत न्यूज नेटवर्ककळवण : एकीकडे कांदा भावात झालेली घसरण, तर दुसरीकडे कष्ट करून पिकवलेला कांदा चाळीतच सडत असल्याने केंद्र व राज्य शासनाने मिळून महाराष्टÑातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी पाचशे कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर करून दिलासा द्यावा, अशी मागणी महाराष्टÑ राज्य कांदा उत्पादक संघाचे संस्थापक अध्यक्ष भरत दिघोळे यांनी केली आहे.राज्य प्रवक्ते शैलेंद्र पाटील यांनी कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी व व्यापाऱ्यांची भेट घेऊन संवाद साधला. सद्यस्थितीत कांदा चाळीमधील कांद्याची स्थिती, बाजार समित्यांमध्ये कांद्याला मिळणारा दर याविषयी कांदा उत्पादक शेतकºयांच्या भावना त्यांनी जाणून घेतल्या. मागील चार ते पाच महिन्यांपासून कोरोनामुळे देशात सुरू असलेल्या सततच्या लॉकडाऊन व कांदा निर्यातीवर आलेल्या मर्यादा तसेच देशांतर्गत कांद्याला मिळणारा कवडीमोल दर यामुळे कांदा उत्पादक शेतकºयांना मोठ्या आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागत आहे. एकीकडे उत्पादन खर्चापेक्षाही निम्म्या दराने कांदा विकण्याची वेळ शेतकºयांवर आलेली असताना दुसºया बाजूला कांदा निम्म्यापेक्षाही जास्त कांदाचाळींमध्येच सडत असल्याने शेतकºयांचे दुहेरी नुकसान होत आहे. केंद्र व राज्य सरकार एकमेकांकडे बोट दाखवून वेळ मारून नेत असून, आर्थिक संकटात सापडलेल्या कांदा उत्पादकांना दोन्ही सरकारने मिळून पाचशे कोटी रुपयांचे विशेष पॅकेज देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. कळवण बाजार समितीत सचिव रवींद्र हिरे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी संपर्कप्रमुख कुबेर जाधव, प्रदेश संघटक कृष्णा जाधव, जिल्हाध्यक्ष जयदीप भदाणे, कळवण तालुकाध्यक्ष विलास रौंदळ, दुष्यंत पवार, शिवाजी पवार, ओंकार पाटील, बाजार समिती संचालक सुनील देवरे, घनश्याम पवार उपस्थित होते...तर प्रशासनाच्या दारात ओतणार कांदाकांदा उत्पादक शेतकºयांच्या मागण्या त्वरित मान्य करून शेतकºयांचे नुकसान रोखण्यासाठी तातडीने पॅकेजची घोषणा न झाल्यास आगामी काळात जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर व तालुका स्तरावर तहसीलदार कार्यालयाबाहेर कांदे ओतून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी दिघोळे यांनी दिला.

टॅग्स :onionकांदाMarketबाजार