शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

‘हे गणराया यांना सुबुद्धी दे’

By admin | Updated: December 22, 2015 23:47 IST

इंदिरानगर बोगदा : निनावी फलक चर्चेत

इंदिरानगर : सहा महिन्यांपूर्वी पोलिसांनी एकतर्फी निर्णय घेऊन बंद केलेला इंदिरानगर उड्डाणपूल बोगदा सुरू करण्यासाठी अनेकविध आंदोलने करूनही पोलीस प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे पाहून ‘हे गणराया यांना सुबुद्धी दे’ असा निनावी फलक बोगद्याजवळ लावण्यात आल्याने शहरात चर्चेचा विषय झाला आहे. या फलकामुळे संबंधिताना सुबुद्धी मिळेल की नाही हे समजू शकले नसले तरी, वाहनचालकांचा फेरा मात्र सुटलेला नाही. मुंबई-आग्रा महामार्गावरील सर्वाधिक लांबीच्या उड्डाणपुलाला इंदिरानगर जवळ बोगदा करण्यात आलेला असून, हा बोगदा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर व तेथील वाहतुकीचा विचार करूनच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. परंतु सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जून महिन्यात पोलीस प्रशासनाने या बोगद्यातून इंदिरानगरहून गोविंदनगरकडे ये-जा करणारी वाहतूक पूर्णपणे बंद करून बोगद्याच्या तोंडाशी सीमेंटचे गर्डर टाकले आहेत. बोगदा बंद झाल्याने इंदिरानगर-गोविंदनगरकडे ये-जा करणारी वाहतूक बाधित झाली असून, वाहनधारकांना मोठा फेरा मारावा लागत आहे. हा बोगदा वाहनांसाठी खुला करावा यासाठी सर्वपक्षीय आंदोलन करण्यात येऊन पोलीस आयुक्तांना निवेदनही देण्यात आले. परंतु पोलीस आपल्या भूमिकेवर आजही ठाम आहेत. त्यामुळे सोमवारी हा बोगदा वाहनांसाठी खुला करण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. लोकशाही मार्गाने आंदोलने करूनही दखल घेतली जात नसल्याचे पाहून काही नागरिकांनी इंदिरानगर बोगद्याला लागून असलेल्या श्री शनि मंदिराच्या कुंपणावरच ‘हे गणराया यांना सुबुद्धी दे’ असा भला मोठा फलक लावला आहे. मंगळवारी सकाळी या रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांचे फलकाने लक्ष वेधून घेतले.