शिक्षण विभागातील प्रकार : सीईओंचे प्रशासकीय कारवाईचे आदेशनाशिक : विभागीय आयुक्त कार्यालयाकडे विभागीय चौकशीसाठी प्रलंबित असलेल्या प्रकरणांची परस्पर चुकीची माहिती दिल्याने प्राथमिक शिक्षण विभागातील दोेन कर्मचारी अडचणीत आले आहेत. प्राथमिक शिक्षणाधिकार्यांची स्वाक्षरी घेऊन परस्पर सदोष माहिती दिल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी या दोघांवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकारी रहीम मोगल यांना दिले.विभागीय आयुक्त कार्यालयाकडे विविध विभागांतील कर्मचार्यांची विभागीय चौकशी अहवाल व प्राप्त प्रकरणांची माहिती जिल्हा परिषदेला पाठवायची आहे. त्यातही अन्य विभागांनी नेमून दिलेल्या नमुन्यात माहिती तयार केलेली असताना, प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील कार्यालयीन अधीक्षक अरुण जाधव व वरिष्ठ लिपिक विश्वंभर यांनी मात्र रहीम मोगल यांच्या स्वाक्षरीने दिलेल्या प्रस्तावात अवघ्या चारच कर्मचार्यांची माहिती दिली. वास्तविक पाहता शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे विभागीय चौकशीसाठी प्राप्त व एकूण प्रकरणांची संख्या जास्त असल्याचे सुखदेव बनकर यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी या दोन्ही कर्मचार्यांची चांगलीच कानउघडणी केली. प्राथमिक शिक्षणाधिकारी रहीम मोेगल यांनीही आपल्याला न विचारताच ही माहिती तुमच्याकडे पाठविण्यात आल्याचे बनकर यांना सांगताच सुखदेव बनकर यांनी अरुण जाधव व विश्वंभर या दोन्ही कर्मचार्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. (प्रतिनिधी)
चुकीची माहिती दिल्याने दोन कर्मचारी गोत्यात
By admin | Updated: May 13, 2014 00:30 IST