शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

...तर मुलींनो दुर्गावतार दाखवा : आदित्य ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 00:52 IST

मुलांपेक्षा मुली नक्कीच अधिक बुद्धिवान असून, त्यांच्यात निर्णयक्षमता जास्त असते. त्यामुळे बाका प्रसंग ओढवल्यास मुलींनी घाबरून जाऊ नये, प्रतिकारासाठी धाडस करून स्वत:मधील दुर्गा, कालिकेचा अवतार छेड काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या टवाळखोराला दाखवून द्यावा, असे आवाहन शिवसेना युवासेनेचे आदित्य ठाकरे यांनी केले.

नाशिक : मुलांपेक्षा मुली नक्कीच अधिक बुद्धिवान असून, त्यांच्यात निर्णयक्षमता जास्त असते. त्यामुळे बाका प्रसंग ओढवल्यास मुलींनी घाबरून जाऊ नये, प्रतिकारासाठी धाडस करून स्वत:मधील दुर्गा, कालिकेचा अवतार छेड काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या टवाळखोराला दाखवून द्यावा, असे आवाहन शिवसेना युवासेनेचे आदित्य ठाकरे यांनी केले.  शिवसेना युवा सेनेच्या वतीने शहरातील हनुमानवाडी लिंकरस्त्यावर एका लॉन्समध्ये आयोजित स्वसंरक्षण उपाययोजना वर्गाच्या समारोपप्रसंगी ठाकरे बोलत होते. मुलींवर होणा-या वाढत्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी युवासेनेच्या वतीने त्यांना प्रतिकार करण्यासाठी स्वसंरक्षणार्थ धडे देण्यात आले. यामध्ये हातातून हात निसटून सुटका करणे, हल्लेखोरांनी गळा दाबून धरला असल्यास तसेच दोन्ही हातांनी आवळून धरून ठेवण्याचा प्रयत्न केल्यास प्रतिकार करत त्याच्या तावडीतून क से निसटावे.मुलींनी दाखविले प्रात्यक्षिकप्रशिक्षक मेहुल वोरा, अनिल भोसले, जस्मीन मकवाना, संजय दरेकर या कराटे प्रशिक्षकांनी उपस्थित दहा ते बारा शाळा-महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे दिले. यावेळी प्रशिक्षकांनी सांगितलेल्या उपाययोजनांप्रमाणे मुलींनी स्वसंरक्षणाचे प्रात्यक्षिक उपस्थित अन्य विद्यार्थिनींपुढे सादर केले. दरम्यान, काही मुलींनी प्रशिक्षण वर्गाविषयीचे मनोगतही व्यक्त केले.त्याने डोक्याच्या केसांना घट्ट धरून ठेवल्यास अन् धारधार शस्त्राचा धाक दाखविल्यास कसा प्रतिकार करावा, याबाबत तज्ज्ञ कराटे प्रशिक्षकांनी सुमारे तीन ते चार तास उपस्थित शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थिनींना प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून धडे दिले. यावेळी शहरातील सुमारे दहा ते बारा शाळा, महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या.  यावेळी आदित्य म्हणाले, हल्लेखोरांच्या बाबतीत मुलींनी सतर्कता बाळगावी. बाका प्रसंग ओढवल्यास त्या हल्लेखोराच्या संवेदनशील अवयव उदा. डोळे, कान, नाक यावर आघात करण्याचा प्रयत्न करावा. यावेळी धीर धरावा आणि ‘बचाओ-बचाओ’चा आवाज अधिक जोरजोराने काढण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून लोकांचे लक्ष वेधले जाईल आणि हल्लेखोराच्या पोटातही भीतीचा गोळा उठेल. दरम्यान, आदित्य यांनी विद्यार्थिनींसोबत ‘सेल्फी’सेशनही केले. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार हेमंत गोडसे, गटनेता विलास शिंदे, अजय बोरस्ते, माजी महापौर विनायक पांडे, सचिन मराठे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाNashikनाशिक