शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात पुन्हा बालिकेचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 00:53 IST

घोटी : इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात चार दिवसांपूर्वी बिबट्याचे संचार क्षेत्र असलेल्या अधरवड शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय बालिकेची शिकार झाली असतानाच शुक्रवारी (दि.२०) पुन्हा चार ते पाच किमी अंतरावर दुसरी हृदयद्रावक घटना घडली आहे.

घोटी : इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात चार दिवसांपूर्वी बिबट्याचे संचार क्षेत्र असलेल्या अधरवड शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय बालिकेची शिकार झाली असतानाच शुक्रवारी (दि.२०) पुन्हा चार ते पाच किमी अंतरावर दुसरी हृदयद्रावक घटना घडली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात पिंपळगाव मोर शिवारातील एका सहा वर्षीय बालिकेचा बळी गेल्याने परिसर हादरला आहे.पिंपळगाव मोर शिवारात जंगलालगत असलेल्या वस्तीवर दोन लहान मुलांसोबत सहा वर्षीय बालिका शौचास गेलेली असताना बिबट्याने अचानक झडप घालून मुलीस ओढत नेले. सोबतच्या मुलांनी आरडाओरड करताच मुलीचे आजोबा अमृता ढवळू गांगड यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र बिबट्याने न जुमानता बालिकेस जंगलात ओढत नेले. शुक्रवारी (दि.२०) सकाळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी धाव घेऊन शोधमोहीम राबविली असता दुर्दैवाने त्या बालिकेचे धड व शीर दोन ठिकाणी आढळून आले. कविता आनंद मधे असे मृत्युमुखी पडलेल्या बालिकेचे नाव असून, ती आपल्या कुटुंबासमवेत घोटी-भंडारदरा मार्गावरील पिंपळगाव मोर शिवारातील भैरवनाथ मंदिराच्या वनविभागाच्या वस्तीत राहत होती. गुरुवारी (दि.१९) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बिबट्याने तिला जबड्यात धरून फरफटत नेले होते. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी तीन पिंजरे व ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले असून, पश्चिम भाग वनविभागाचे रेस्क्यू टीम पथक बिबट्याच्या शोधासाठी गस्त घालत आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक