शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

काननवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात बालिकेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 15:22 IST

घोटी : इगतपुरी तालुक्यातील खेडभैरव लगत असलेल्या काननवाडी शिवारात कु. गौरी गुरुनाथ खडके तीन वर्षे वयाच्या बालिकेस मंगळवारी (दि.२२) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास तिच्या कुटूंबियांसमोर बिबटयाने हल्ला करून जंगलाच्या दिशेने ओढत नेले. त्यात ही चिमुकली गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान तिचे निधन झाले. बिबट्याच्या तावडीतून गौरीला सोडवण्यात कुटुंबाला यश आले असले तरी गौरीची मृत्युशी झुंज अपयशी ठरली.

घोटी : इगतपुरी तालुक्यातील खेडभैरव लगत असलेल्या काननवाडी शिवारात कु. गौरी गुरुनाथ खडके तीन वर्षे वयाच्या बालिकेस मंगळवारी (दि.२२) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास तिच्या कुटूंबियांसमोर बिबटयाने हल्ला करून जंगलाच्या दिशेने ओढत नेले. त्यात ही चिमुकली गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान तिचे निधन झाले. बिबट्याच्या तावडीतून गौरीला सोडवण्यात कुटुंबाला यश आले असले तरी गौरीची मृत्युशी झुंज अपयशी ठरली.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी गौरी घरासमोर आपल्या आई, वडील, आजोबा यांच्या सोबत बसली होती. याचवेळी मागून आलेल्या बिबट्याने गौरीवर हल्ला करून तिला कुटुंबासमोर फरफटत जंगलात ओढून नेण्यास सुरुवात केली. अचानक कोसळलेल्या या संकटामुळे कुटुंब भांबावले आणि त्यांनी गौरीला वाचवण्यासाठी आरडाओरड केली व बिबट्याचा पाठलागही केला. आरडाओरड झाल्याने बिबट्याने काही अंतरावर गुरतुलेच्या झुडपात गौरीला सोडून देत जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. कुटुंबातील सर्वांनी गौरीला ताब्यात घेतले असता ती गंभीर जखमी झाल्याचे दिसून आले. तिला तातडीने घोटी ग्रामीण रुग्णालयात नेऊन प्रथमोपचार करण्यात आले. त्यानंतर प्रकृति बिघडल्याने तिला नाशिक येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुर्दैवाने बुधवारी (दि.२३) दुपारी तिची प्राणज्योत मालवली. दरम्यान खेड जवळील काननवाडी येथे घटनास्थळी वनविभागाच्यावतीने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी २ पिंजरे लावले असून तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी इगतपुरी म.ब.पाटील, वनपरिमंडल अधिकारी डी. एस. ढोन्नर, वनरक्षक एम. जे. पडवी, एफ. जे. सैय्यद, सी. डी. गाढर, बी. एस. खाडे, एस. के. बोडके, के. एल. पोटींदे, वनमजूर दशरथ निर्गुडे, श्रावण निर्गुडे, पूणाजी कोरडे, भोरू धोंगडे, मुजीब शेख आदी तळ ठोकून बसले आहेत.इन्फोकुटुंबाचा लढा अपयशी...चिमुकल्या गौरीला बिबट्या फरफटत नेत असतांना संपूर्ण कुटुंब तिच्या रक्षणासाठी धावले. बिबट्याचा प्रतिकार केला. जिवाच्या आकांताने आरडाओरडा करून हातात असेल ते भिरकावून बिबट्याच्या तावडीतून मुलीला सोडवले. संपूर्ण कुटुंबाने हिम्मत दाखवून लढा दिला. बिबट्याच्या तावडीतून सुटल्यानंतर गौरीला बघून तिच्या मातेने हंबरडा फोडला आणि आणि कुटूंबाने तिला घेऊन उपचारासाठी घोटी, नाशिक येथे दाखल केले. परंतु त्यात तिला वाचवण्यात अपयश आले. या बद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिक