शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

धुमोडी गावात बिबट्याचा हल्ल्यात बालिका ठार; चार तासांची शोधमोहीम, मृतदेह सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 00:09 IST

बिबट्याने मुलीला उचलून नेल्याचे समजताच गावकऱ्यांनी त्याच्या पाठीमागे धाव घेतली. घटनेची माहिती वनविभागाला कळविण्यात आली.

- अझहर शेख

नाशिक : वनपरिक्षेत्रातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात असलेल्या धुमोडी गावात बिबट्याने सोमवारी (दि.4) संध्याकाळी साडे सात वाजेच्या सुमारास एका शाळकरी मुलीवर हल्ला चढविला. जबड्यात धरून बिबट्या मुलीला जंगलात घेऊन गेला. सुमारे साडे चार तास वनकर्मचारी व गावकऱ्यांनी परिसर पिंजून काढला असता रात्री 11 वाजेच्या सुमारास गावापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या झाडोऱ्यात बलिकेचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आला. या हल्ल्याने गावात घबराट पसरली आहे. वनविभागाच्या नाशिक वनपरिक्षेत्र कार्यालयाकडून मिळालेली अधिक माहिती अशी, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील  मौजे धुमोडी गावाच्या शिवारात असलेल्या वाघ कुटुंबियांच्या घराच्या अंगणातून रुची एकनाथ वाघ (८) हिला बिबट्या जबड्यात धरून वेगात संध्याकाळी सात वाजता जंगलात पळाला. बिबट्याने मुलीला उचलून नेल्याचे समजताच गावकऱ्यांनी त्याच्या पाठीमागे धाव घेतली. घटनेची माहिती वनविभागाला कळविण्यात आली. माहिती मिळताच वन परिक्षेत्र आधिकारी विवेक भदाणे हे पथकासह घटनास्थळी रवाना झाले. अंजनेरी, मुळेगावसह नाशिकचे वन कर्मचाऱ्यांचे अतिरिक्त पथकाला घटनास्थळी त्यांनी पाचारण केले. वनरक्षक, वन मजुरांसह गावकऱ्यांनी सुमारे चार ते साडे चार तास शोध घेतला.

हातात बॅटरी घेऊन सर्वत्र बलिकेचा शोध घेतला जात होता मात्र अंधार असल्याने बालिका आढळून येत न्हवती अखेर 11 वाजता बलिकेचा शव गावापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या झाडाझुडुपांमध्ये पडलेले दिसून आले. वन कर्मचाऱ्यांनी शव ताब्यात घेत पंचनामा करून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलविले. या घटनेने संपूर्ण धुमोडी पंचक्रोशीत दहशत पसरली असून मुक्त संचार करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, बिबट्याच्या प्रवण क्षेत्रात वनखात्याकडून रात्रीच पिंजरे तैनात करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या होत्या.

टॅग्स :leopardबिबट्या