शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गिरीष महाजन यांनी दुभाजकावरुन उडी घेत आरोग्य विद्यापीठ निदर्शकांचे ऐकले गा-हाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 20:25 IST

महाजन यांची मुलाखत अंतीम टप्प्यात सुरू असताना काही महिला कामगारांनी सभागृहात एकत्र उठून हातातील ‘जवाब दो’ पत्रक झळकवित आम्हांला न्याय कधी देणार? असा संतप्त सवाल उपस्थित केला.

ठळक मुद्देमुलाखतीत व्यत्यय आला;सर्व महिला कामगारांनी सभागृह सोडले. शिष्टमंडळाने त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिलेतोडगा काढण्याचे आश्वासन महाजन यांनी निदर्शने करणा-या कंत्राटी कामगारांना दिले.

नाशिक : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये समान वेतन लागू करावा, कंत्राटी कामगारांना नियमीत सेवेत कायम करावे, आरोग्य विज्ञान विद्यापिठाच्या प्रशासनाकडून होणारा भेदभावाला आळा घालावा, अशा विविध मागण्यांसाठी सीटू संलग्न महाराष्ट आरोग्य विज्ञान विद्यापीठ कंत्राटी कामगार संघटनेच्या वतीने सावानाबाहेर निदर्शने करण्यात आली. यावेळी वैद्यकिय शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री गिरीष महाजन यांनी निदर्शकांची भर रस्त्यात भेट घेऊन गा-हाणे ऐकले.नियमीत कर्मचारी व कंत्राटी कर्मचा-यांच्या कामाचे स्वरुप समान असून त्यांच्या लाभामध्ये मात्र मोठी तफावत आहे. कामगार उपआयुक्तांकडे वारंवार तक्रारी करुनदेखील विद्यापीठाच्या कंत्राटी कामगारांना न्याया मिळू शकलेला नाही. विद्यापीठ प्रशासनाकडून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे होत असलेले उल्लंघन व नऊ कर्मचा-यांना प्रशासनाने कामावरुन कमी केल्याचा आरोप संघटनेने महाजन यांना सोपविलेल्या निवेदनातून केला आहे. विद्यापीठामधील कंत्राटीपध्दतीने कामगार भरण्याची पध्दतील प्रतिबंध करावा तसेच सध्या कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांना नियमित सेवेत समावून घ्यावे. तसेच घरभाडे भत्ता पुर्वलक्ष प्रभावाने आपल्या पत्रानुसार मिळवून द्यावा, कामगारांना पगाराची पावती व २६ दिवसांचे वेतनाची रक्कम अदा करावी, अशा विविध मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने महाजन यांना कार्यक्षम आमदार पुरस्काराने रविवारी (दि.२६) गौरविण्यात आले. या सोहळ्याच्या निमित्ताने संघटनेच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. तत्पुर्वी महाजन यांची मुलाखत अंतीम टप्प्यात सुरू असताना काही महिला कामगारांनी सभागृहात एकत्र उठून हातातील ‘जवाब दो’ पत्रक झळकवित आम्हांला न्याय कधी देणार? असा संतप्त सवाल उपस्थित केला. त्यामुळे मुलाखतीत व्यत्यय आला अखेर महाजन यांनी ‘ही पध्दत चुकीची असून अशा पध्दतीने कार्यक्रमात व्यत्यय आणणे गैर आहे, मी कार्यक्रमानंतर भेट घेतो’ असे सांगितले. यानंतर सर्व महिला कामगारांनी सभागृह सोडले.भर रस्त्यात साधला संवादसोहळाआटोपून महाजन हे सभागृहाबाहेर आले असता शिष्टमंडळाने त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. सावानासमोर भर रस्त्यावर रणरणत्या उन्हात फलक घेऊन उभे असलेले निदर्शक बघून महाजन यांनी ‘यांचे नेमके काय म्हणणे आहे’ असे सांगत त्यांच्या दिशेने जाण्यासाठी थेट दुभाजकावरुन उडी घेतल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. यावेळी निदर्शकांनी येत्या मंगळवारपर्यंत मंत्रालयात बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन महाजन यांनी निदर्शने करणा-या कंत्राटी कामगारांना दिले.