शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

मंदिर पुनर्निर्माणासाठी स्वतंत्र अधिकारी गिरीश महाजन : पालघर जिल्ह्यातील ठाकरे दाम्पत्य ठरले पहिल्या दर्शनाचे मानकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 00:20 IST

त्र्यंबकेश्वर : निवृत्तिनाथ महाराज मंदिराच्या पुनर्निर्माण कामासाठी स्वतंत्र प्रशासकीय अधिकारी नेमण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल, असे प्रतिपादन जलसंपदा, वैद्यकीय शिक्षण, खार व जमीन विकासमंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले.

ठळक मुद्देपहाटे शासकीय महापूजामंदिराच्या कामास गती येणार

त्र्यंबकेश्वर : निवृत्तिनाथ महाराज मंदिराच्या पुनर्निर्माण कामासाठी स्वतंत्र प्रशासकीय अधिकारी नेमण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल, असे प्रतिपादन जलसंपदा, वैद्यकीय शिक्षण, खार व जमीन विकासमंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले. संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यात्रा महोत्सवानिमित्त निवृत्तिनाथ महाराज समाधीची पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पत्नी साधना यांच्यासह आज पहाटे शासकीय महापूजा केली, त्याप्रसंगी ते बोलत होते. पूजेप्रसंगी आमदार बाळासाहेब सानप, निर्मला गावित, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, उपनगराध्यक्ष स्वप्निल शेलार, मंदिर संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. संजय महाराज धोंगडे, श्रीकांत भारती, सचिव पवनकुमार भुतडा, विश्वस्त त्र्यंबकराव गायकवाड, पुंडलिक थेटे, उपविभागीय अधिकारी राहुल पाटील, मुख्याधिकारी चेतना केरूरे, पंडितराव कोल्हे, कैलास चोथे, भाजपा शहराध्यक्ष श्यामराव गंगापुत्र, गटनेते समीर पाटणकर, सागर उजे, विष्णू दोबाडे, दीपक गिते, भारती बदादे, सायली शिखरे, अशोक घागरे, त्रिवेणी तुंगार, कल्पना लहांगे, अनिता बागुल, माधवी भुजंग, शीतल उगले, मंगला आराधी, संगीता भांगरे, शिल्पा रामायणे, संत साहित्याचे अभ्यासक गुट्टे महाराज यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मंत्री महाजन म्हणाले, येथील पावित्र्य व श्रद्धेमुळे मंदिराचे वेगळे महत्त्व असून, मंदिराची नव्याने भव्य वास्तू उभी राहील. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन झाल्याने या काळ्या पाषाणात साकारणाºया मंदिराच्या कामास गती येणार आहे. कुंभमेळ्याच्या उत्कृष्ट कामांमुळे येथील रस्ते चांगले आहेत. तसेच भाविकांसाठी असंख्य सोयीसुविधा निर्माण झाल्या आहेत. येथील निसर्ग संपन्न डोंगररांगा, तलाव, पौराणिक ठिकाणे यांचा पर्यटन विकासासाठी देखील उपयोग होईल. कुंभमेळ्याची जागतिक वारसा म्हणून ‘यूनो’ने नोंद घेतली असून, यानिमित्ताने त्र्यंबकेश्वरची वेगळी ओळख जगासमोर आली आहे. ही यात्रा ‘निर्मलवारी’ होण्यासाठी शासनाने उपाययोजना केल्या आहेत. विविध संघटना, सामाजिक संस्थांच्या सहाय्याने यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पंढरपूर व आळंदीप्रमाणेच हे स्वच्छ निर्मलवारीचे काम येथे झाले आहे, असे महाजन म्हणाले. यापूर्वी मंदिराचे पुजारी जयंत गोसावी यांनी निवृत्तिनाथ महाराज संजीवन समाधीची विधिवत पंचामृत पूजाविधीचे मंत्रपठण केले. यावेळी नगर परिषदेचे पदाधिकारी, नगरसेवक, मंदिर संस्थानचे विश्वस्त मंडळ सदस्य, भाविक उपस्थित होते.पालकमंत्र्यांकडून निर्मलवारीचे कौतुकयंदाची वारी निर्मलवारी म्हणून घोषित केली असल्याने यात्रेचे महत्त्व अधिक आहे. सुमारे २० हजारांहून अधिक कार्यकर्ते निर्मलवारी पूर्ण करण्यासाठी काम करत आहेत. त्र्यंबकेश्वर हे निसर्ग व धार्मिक महात्म्य यांचा संगम असून, येथे पर्यटनाच्या दृष्टीने विकासाच्या संधी असल्याने जागतिक पातळीवरील एक अध्यात्मिक धार्मिक केंद्र करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र असून, या तीर्थक्षेत्राचा महिमा अगाध असल्याचे सांगून निसर्गाने या शहरावर कायमच वरदहस्त ठेवल्यामुळे निसर्गसौंदर्याने नटलेल्या या शहराचा सर्वांनाच मोह पडलेला असतो. हे धार्मिक व अध्यात्मिक क्षेत्र आहे. जागतिक पातळीवर या तीर्थक्षेत्राचा नावलौकिक वाढविण्यासाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे महाजन यांनी सांगितले.