घोटी : शहरात शनिवारी मध्यरात्री भंगारातून मिळालेल्या पेटी विक्र ीवरून झालेल्या वादातून एका इसमाची निर्घृण हत्त्या झाल्याची घटना घडली. दरम्यान, याबाबत घोटी पोलिसांनी तीन संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून, संशयितांना जेरबंद करण्यात आले आहे.शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घोटी शहरातील बाजार समितीच्या शेल हॉल पाठीमागे हिराबाई विठ्ठल हिलम या राहतात. त्यांच्या घरात काही भंगार विक्रेत्यांनी एक लोखंडी पेटी आणून ठेवली होती. ही पेटी घेऊन जाणाऱ्या इसमांना रस्त्यांत काही जणांनी अडविले. या पेटीच्या मागणीवरून त्यांच्यात झटापट झाली. यातच भंगार गोळा करणाऱ्या व्यक्तीची डोक्यात लोखंडी पेटी टाकून निर्घृण हत्त्या करण्यात आली. हिराबाई विठ्ठल हिलम यांच्या घरात निवृत्ती यशवंता दिवे, सुरेश हरी मुकने, सोनू भिका मुकने व रडकू मुकने आदिंना भंगार गोळा करताना मिळालेली एक लोखंडी पेटी आणून ठेवली होती. (वार्ताहर)शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास सुरेश हरी मुकने,सोनू भिका मुकने,व रडकु सक्रू मुकने आदिनी घरी येवून ही लोखंडी पेटी घेवून जाण्याचा प्रयत्न केला.मात्र या बाबीला निवृत्ती याने विरोध दर्शविल्याने सुरेश हरी मुकने,सोनू भिका मुकने,व रडकु सक्रू मुकने आदिनी निवृत्ती याच्या विरोधाला न जुमानता त्याच्या डोक्यात लाकडाचा प्रहार करीत तसेच ही लोखंडी पेटी त्याच्या डोक्यात मारल्याने तसेच त्याचे गुप्तांग कापल्याने निवृत्ती याचा जागीच मृत्यु झाला असल्याची फिर्याद हीराबाई हिलम हिने घोटी पोलिस ठाण्यात दिली आहे.या फिर्यादीवरु न घोटी पोलिसांनी सुरेश हरी मुकने,सोनू भिका मुकने,व रडकु सक्रू मुकने आदि संशियताविरु द्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून या तिघाही संशियताना जेरबंद करण्यात आले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कमलेश बच्छाव आदिसह पोलिस कर्मचारी करीत आहेत.( वार्ताहर )
घोटीत इसमाची हत्त्या
By admin | Updated: August 30, 2015 23:38 IST