शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

योजना अपूर्णावस्थेत असूनही पाणीपट्टी वाढविण्याचा घाट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 01:08 IST

चांदवड : शहरासाठी सुमारे ६३ कोटी रुपयाची स्वतंत्र पाणी योजना ओझरखेड धरणातून मंजूर करण्यात आली असतानाही नगर परिषद प्रशासनाने सर्व नगरसेवकांना अंधारात ठेवून पाणीपट्टी वाढविण्याचा घाट घातला आहे. यामुळे संताप व्यक्त होत आहे.

चांदवड : शहरासाठी सुमारे ६३ कोटी रुपयाची स्वतंत्र पाणी योजना ओझरखेड धरणातून मंजूर करण्यात आली असतानाही नगर परिषद प्रशासनाने सर्व नगरसेवकांना अंधारात ठेवून पाणीपट्टी वाढविण्याचा घाट घातला आहे. यामुळे संताप व्यक्त होत आहे.प्रशासनाने पाणीपट्टीवाढी-संदर्भातील उपविधी तयार करून नगरसेवकांच्या बैठकीपूर्वी ही उपविधी पाठवून दिल्याने नगर परिषदेच्या सर्व नगरसेवकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे, तर सर्वसामान्य नागरिकांना ही पाणीपट्टी सध्या ११०० रुपये असताना सुमारे ४५०० रुपये वार्षिक येईल त्यामुळे बैठकीस व पाणीपट्टी वाढविण्यास सर्व नगरसेवकांनी विरोधाचे पत्र दिले. या पत्राची प्रत मुख्य अधिकारी, जिल्हाधिकारी यांना पाठविल्या आहेत. कोरोनामुळे आधीच व्यापारी व सर्वसामान्य नागरिक त्रस्त असताना त्यात ही दरवाढ लादू नये, असेही पत्रात म्हटले आहे.नळजोडणी पूर्ण होईपर्यंत हा निर्णय रद्द करायोजनेच काम अद्याप काम सुरू आहे. परंतु हे काम किती प्रगतिपथावर आहे यासंदर्भात सभागृहाला माहिती दिली जात नाही. गेल्या सात ते आठ महिन्यांपासून नळजोडणीसंदर्भात विचारणा केली असता नळजोडणीसाठी जिल्हाधिकारी टेंडरला परवानगी देत नाही, अशी माहिती मिळत आहे. जी योजना अपूर्ण आहे ती केव्हा पूर्ण होईल माहीत नाही. या योजनेचे नळजोडणी टेंडर अद्यापपर्यंत झाले नाही. नागरिकांना प्रत्यक्षात पाणी केव्हा मिळेल हे माहीत नसल्याने वाढीव पाणीपट्टी नागरिक कसे भरतील, आदी प्रश्न यानिमित्ताने उपस्थित करण्यात आले.मुख्याधिकारी यांनी आपल्या अधिकारात तयार केलेल्या उपविधीस व दरपत्रकास उपविधीत नमूद केल्याप्रमाणे दर निश्चित केल्याचे लक्षात आल्याने सर्व नगरसेवकांनी विरोध केला. ही योजना पूर्ण झाल्यानंतर नगर परिषद हद्दीतील सर्व नळजोडणी पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना योजनेचा अनुभव घेऊ द्या, त्यानंतर नागरिकांना परवडेल, अशी दर व उपविधीत सर्व नगरसेवकांच्या संमतीने सभागृहात ठरविण्यात यावे, पाणीपुरवठा योजना पूर्ण होईपर्यंत हा निर्णय रद्द करण्याची मागणी नगरसेवकांनी केली आहे.सर्व नगरसेवकांची याबाबतची विशेष सभा दि.२४ जुलै रोजी घेण्यात येणार होती. मात्र ती होण्याआधीच प्रशासनाने पाणीपुरवठा व पाणीपट्टीची उपविधी तयार करून सर्वांना पाठविली. त्यास सर्वांनी विरोध केला तर या दरपत्रकाविषयी व उपविधी विषय सभागृहात अद्यापपर्यंत नगरसेवकांना व सभागृहात कोणतीही माहिती न देता तयार केली.नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल, पाणीपुरवठा सभापती व नगरसेवक जगन्नाथ राऊत, कविता उगले, बाळू वाघ, शालिनी भालेराव, प्रवीण हेडा, जयश्री हांडगे, नवनाथ आहेर, अश्पाक इसाक खान, अल्ताफ तांबोळी, इंदूबाई वाघ, सुनीता पवार, रवींद्र अहिरे, मीना कोतवाल, देवीदास शेलार, पार्वताबाई पारवे, लीलाबाई कोतवाल, राजकुमार संकलेचा या नगरसेवकांनी या निर्णयाचा विरोध केला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक