शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा आमदाराच्या घरासमोर घंटानाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 19:13 IST

शहरातील धार्मिक स्थळे हटवू नये यासाठी बुधवारी मंदिर बचाव समितीने बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीस शहरातील तिन्ही आमदार गैरहजर होते. त्यामुळे त्यांना त्याची जाणीव करून देण्यासाठी त्याची सुरुवात पंचवटी या धार्मिकस्थळाचे आमदार असलेले बाळासाहेब सानप यांच्यापासून करण्यात आली.

ठळक मुद्देमंदिर बचाव समिती : मुख्यमंत्र्यांना भेटणार

नाशिक : नाशिक शहरातील विविध ठिकाणी असलेली मंदिरे व अन्य धार्मिक स्थळांच्या विरोधात कारवाई करण्याच्या मनपाच्या आदेशाच्या विरोधात विश्व हिंदू परिषद, महाराष्ट्र वारकरी संघ, पुरोहित महासंघ, मंदिर मठ बचाव समितीच्या सदस्यांनी गुरुवारी सकाळी पूर्व विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे आमदार बाळासाहेब सानप यांच्या कृष्णनगर येथील निवासस्थानासमोर सुमारे अर्धा तास घंटानाद आंदोलन करून ‘श्री राम जय राम जय जय राम’ असा जयघोष केला.

शहरातील धार्मिक स्थळे हटवू नये यासाठी बुधवारी मंदिर बचाव समितीने बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीस शहरातील तिन्ही आमदार गैरहजर होते. त्यामुळे त्यांना त्याची जाणीव करून देण्यासाठी त्याची सुरुवात पंचवटी या धार्मिकस्थळाचे आमदार असलेले बाळासाहेब सानप यांच्यापासून करण्यात आली. मंदिर बचाव समितीच्या सदस्यांनी सकाळी घंटानाद सुरू केला. आंदोलन सुरू असताना सानप हे कार्यालयात येताच आंदोलन करणाऱ्यांनी त्यांना मंदिर वाचविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा, असे आवाहन केले. यावेळी सानप यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत शहरातील सर्व मंदिरे तसेच मठ वाचविण्यासाठी येत्या काही दिवसांत पालकमंत्र्यांची भेट घेणार आहे. मंदिराचा प्रशासनाने सर्व्हे केला आहे, परंतु तो अत्यंत चुकीचा आहे. सर्व्हे करणाऱ्या काही अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती कळविली आहे, असे सांगत उद्या शुक्रवारी रामायण बंगल्यावर तिन्ही आमदार, महापौर आणि मंदिर बचाव समिती सदस्य यांची बैठक घेण्यात येणार आहे. त्यानंतर पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.शहरात अनेक पुरातन मंदिरे असून, या मंदिरांमुळे संस्कृती टिकून आहे. प्रशासन मंदिर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहे. मंदिरे धर्माचे रक्षण करण्यासाठी असून मंदिरे वाचविणे काळाची गरज आहे, असे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले. यावेळी सतीश शुक्ल, रामसिंग बावरी, कैलास देशमुख, नंदू कहार, प्रवीण जाधव, विजय पवार, मोहन गोसावी, ब्रह्मचारी मारुतीनंद महाराज आदींसह विश्व हिंदू परिषद, वारकरी संघ व मंदिर मठ बचाव समिती सदस्य उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक