शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

योग्य आहाराद्वारे मिळवा निरामय आरोग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 00:29 IST

पहाटे-रात्री सुरू असलेला गारव्याचा खेळ, फळे भाज्यांवर होत असलेली जंतुनाशकांची फवारणी, वातावरणात वाढत चाललेले प्रदूषण, त्यामुळे वाढत जाणारे संसर्गजन्य आजारांचे प्रमाण व पर्यायाने येणारे गुंतागुंतीचे आजार यामुळे मानवी जीवन क्लेशमय बनले आहे. या साºयांना योग्य आहाराद्वारे व प्रामुख्याने निसर्गोपचाराद्वारे सामोरे गेल्यास अनेक आरोयविषयक समस्या दूर होऊन आरोग्यसंपन्न असे यशस्वी जीवन जगता येईल.

नाशिक : पहाटे-रात्री सुरू असलेला गारव्याचा खेळ, फळे भाज्यांवर होत असलेली जंतुनाशकांची फवारणी, वातावरणात वाढत चाललेले प्रदूषण, त्यामुळे वाढत जाणारे संसर्गजन्य आजारांचे प्रमाण व पर्यायाने येणारे गुंतागुंतीचे आजार यामुळे मानवी जीवन क्लेशमय बनले आहे. या साºयांना योग्य आहाराद्वारे व प्रामुख्याने निसर्गोपचाराद्वारे सामोरे गेल्यास अनेक आरोयविषयक समस्या दूर होऊन आरोग्यसंपन्न असे यशस्वी जीवन जगता येईल. निसर्गोपचाराचा सखोल अभ्यास करून त्याचे फायदे अनुभवावेत, असा सल्ला आहारतज्ज्ञांनी दिला आहे. कृत्रिम व आरोग्यास हानिकारक पेयांऐवजी नैसर्गिक पेयांवर भर द्यावा, असा सूरही त्यांच्या बोलण्यातून अधोरेखित झाला आहे.चहा, कॉफीऐवजी दूध, दही, ताक, सोलकढी यांचा वापर वाढवावा. फ्ल्यूसारख्या आजारांना दूर ठेवण्यासाठी रात्रीच्या वेळी तांब्याच्या भांड्यात खडीसाखर, धणे, बडिशोप समप्रमाणात घ्यावे. त्यात पाणी टाकून ते झाकून ठेवावे. दुसºया दिवशी सकाळी हे पाणी तसेच किंवा गाळून प्यावे. यामुळे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर पडतात. याशिवाय रात्री झोपताना डोळ्यावर गुलाबपाण्यात बुडवलेले कापसाचे बोळे ठेवावेत.वाढते प्रदूषण, ताणतणाव, भेसळयुक्त आहार- विहार यापासून शरीराला स्वच्छ व सुरक्षित ठेवायचे असेल तर निसर्गनिर्मित आहारावर भर द्यावा. यामुळे शरीर या सर्व संकटांशी सामना करण्यास सज्ज होते. निसर्गाने आपल्या शरीरात सर्व व्यवस्था केली आहे. तहान लागणे, भूक लागणे, पोट भरणे, झोप येणे, जाग येणे या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष होते. आहार हे आपल्या शरीराचे इंधन आहे. त्यामुळे त्याच्या वेळा पाळून, प्रकृतीदुसार सात्विक आहार घेतल्यास तसेच कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळल्यास आरोग्य चांगले राहू शकते. आहाराबरोबरच योगासने, प्राणायाम, ध्यान असे व्यायामप्रकारही महत्त्वाचे आहेत. - सुनंदा सखदेव, निसर्गोपचार तज्ज्ञमिश्र हवामानात आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. दिवसभरात भरपूर पाणी प्यावे. दही, ताक, पंजिरी यांचा आहारात समावेश करावा. फ्रीजमधील पाणी, बर्फ, कोल्ड्रिंक्स याऐवजी कोकम सरबत, लिंबू सरबत, वाळ्याचे सरबत, तुकुमराईची खीर अशा नैसर्गिक पेयांचे प्रमाण वाढवावे. उन्हातून आल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नये. थोडावेळ शरीर स्थिर झाल्यानंतर माठातले किंवा साधे पाणी प्यावे. पूर्वापार चालत आलेला गूळपाणी हा तर सर्वोत्तम पर्याय आहे.