शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नक्षली भागात सेवा बजावण्यास तयार राहा : सतीश माथूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 23:55 IST

पोलीस अधिकारी-कर्मचारी राज्याच्या पूर्वेकडील नक्षली भागात सेवा करण्याबाबत नाखूष असतात; मात्र नक्षली भागात सेवा बजावण्याबाबत सकारात्मकता दाखवून देशसेवेची एक उत्तम संधी म्हणून त्याकडे बघावे आणि स्वत:च्या मनाची तयारी ठेवावी, असे आवाहन राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी केले.

नाशिक : पोलीस अधिकारी-कर्मचारी राज्याच्या पूर्वेकडील नक्षली भागात सेवा करण्याबाबत नाखूष असतात; मात्र नक्षली भागात सेवा बजावण्याबाबत सकारात्मकता दाखवून देशसेवेची एक उत्तम संधी म्हणून त्याकडे बघावे आणि स्वत:च्या मनाची तयारी ठेवावी, असे आवाहन राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी केले.महाराष्टÑ पोलीस अकादमी, नाशिकच्या नवीन संकेतस्थळाचे अनावरण आणि परिसरात वृक्षारोपणाच्या कार्यक्रमानिमित्त माथूर यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी नक्षली भागातील सेवा करण्याबाबत पोलिसांचा असलेला नकारात्मक दृष्टिकोन ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. पोलिसांनी देशसेवेसाठी कुठल्याही भागात जाण्याची तयारी ठेवून उत्तम संधी म्हणून आपले कौशल्य दाखवून आदर्श निर्माण करावा, असे सांगितले. यावेळी माथूर यांनी पोलीस अधिकारी-कर्मचारी यांच्या नक्षली भागात सेवा बजावण्याबाबत असलेल्या दृष्टिकोनाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. यापुढे कोणालाही यामधून सूट दिली जाणार नाही. २७ परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षकांनी आपली मानसिकता तयार करावी आणि आतापासूनच तेथे सेवा बजावण्याबाबत स्वत:ला सज्ज ठेवावे, अशा सूचनेतून इशारा दिला. प्रशिक्षण केंद्रात मूलभूत शिक्षण देत अधिकारी घडविण्याची जबाबदारी अकादमीवर असते. त्यामुळे सक्षम अधिकाऱ्यांनी अकादमीमध्ये नियुक्ती घेत सेवा कार्य बजवावे, असेही माथूर म्हणाले. याप्रसंगी विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलीस अधीक्षक संजय दराडे, अकादमीच्या नूतन संचालक अश्वती दोरजे, सहसंचालक जालिंदर सुपेकर, मंजुला माथूर, रोहिणी दराडे आदी उपस्थित होते.दरम्यान, माथूर यांच्या हस्ते नव्या संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. तसेच अकादमीच्या आवारात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आणि आगामी वनमहोत्सवाला हातभार म्हणून वृक्षारोपणही करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी विविध रोपांची लागवड करत पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूक राहण्याचा संदेश पोलीस दलाला दिला.‘वेळोवेळी कायद्याच्या परीक्षा घ्या’सर्व पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षकांनी आपापल्या खात्याच्या अंतर्गत असलेल्या पोलीस अधिकाºयांच्या वेळोवेळी कायद्याच्या परीक्षा घेण्यावर भर द्यावा, अशी सूचनाही माथूर यांनी यावेळी केली. कारण आजच्या आधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्या युगात कायद्याबाबतचे ज्ञान अद्ययावत ठेवण्याची गरज आहे, असे सांगत यासाठी ई-अकॅडमीवर उपलब्ध आॅनलाइन परीक्षेचा वापर करणे सहज शक्य असल्याचेही त्यांनी यावेळी सुचविले.

टॅग्स :Policeपोलिस