शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

कुंभमेळ्यासाठी जादा निधी मिळावा : तावडे

By admin | Updated: July 12, 2014 00:23 IST

कुंभमेळ्यासाठी जादा निधी मिळावा : तावडे

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी जादा निधी मिळावा म्हणून उत्तर महाराष्ट्रातील खासदारांसह आपण केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांची भेट घेणार आहोत,अशी माहिती विरोधी पक्षनेते आमदार विनोद तावडे यांनी दिली. बंद विमानतळ सुरू करण्यासारखे खोटे स्टंट केल्यानेच छगन भुजबळ यांचे विमान दिल्लीला टेक आॅफ होऊ शकले नाही,अशी खिल्लीही तावडे यांनी उडविली.नाशिकला आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कोट्यवधीचा निधी मंजूर झाला; मात्र कामांना अद्यापही सुरुवात झालेली नाही. ज्याप्रमाणे उत्तर प्रदेश सरकारने तेथील सिंहस्थ कुंभमेळ्याचे जगभरात पर्यटनाचे मार्केटिंग केले; मात्र छगन भुजबळ नाशिकला कुंभमेळा असताना आणि येथील पालकमंत्री तथा राज्याचे पर्यटनमंत्री असूनही सिंहस्थाचे जगभरात पर्यटनाच्या दृष्टीने मार्केटिंग झालेले नाही, असा आरोप तावडे यांनी केला. नाशिकला धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात जास्तीत जास्त निधी मिळावा, यासाठी उत्तर महाराष्ट्रातील खासदारांसह आपण वित्तमंत्री अरुण जेटली यांची १५ जुलै रोजी भेट घेणार असून, त्यांंच्याकडे कुंभमेळ्यासाठी जास्तीत जास्त निधी मिळण्याबाबत चर्चा करणार असल्याचे तावडे यांनी सांगितले.इतकेच नव्हे तर धुळे-जळगाव महामार्गाचे चौपदरीकरण करण्यासाठी केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी अनुकूलता दर्शविली असून, आधी राज्य शासनाने या महामार्गावरील जमिनींचे भूसंपादन करावे, केंद्र शासन तत्काळ काम सुरू करेल,असे आश्वासनच गडकरी यांनी दिले आहे. शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण करण्याची घोषणा आघाडी सरकारने केली, मात्र ती फसवीच असल्याचे दिसून येते. कारण आजपर्यंत एकाही शेतकऱ्याच्या कर्जाचे पुनर्गठन झालेले नाही. नाशिक व औरंगाबाद ही प्रगतिशील शहरे असून, या शहरांना विकासकामांसाठी जास्तीत जास्त निधी मिळवून देण्याचे आमचे धोरण राहणार आहे. यावेळी माजी मंत्री डॉ. दौलतराव अहेर, सुहास फरांदे, शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, गिरीश पालवे, बिरदीचंद नहार आदि उपस्थित होते.(प्रतिनिधी)