सायखेडा : औरंगपूर , बागलवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गायत्री शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली,माजी सरपंच बाळासाहेब खालकर यांनी एक महिन्यापूर्वी राजीनामा दिला होता. रिक्त जागेवर रोटेशन पद्धतीने गायत्री शिंदे यांची वर्णी लागली.शिंदे यांचा एकमेव अर्ज आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी बी.पी. कारवाल यांनी जाहीर केले. सदर अर्जावर गोरख खालकर सूचक तर शरद आढाव यांनी अनुमोदन दिले. यावेळी पंचायत समिती सदस्य सोपान खालकर, उपसरपंच अमिना इनामदार, आरिफ इनामदार, सदस्य बाळासाहेब खालकर, गोरख खालकर, शरद आढाव, नामदेव माने, निर्मला बागल, कारभारी खालकर, विष्णू शिंदे, रमेश शिंदे, निवृत्ती खालकर, अन्वर शेख, कैलास खालकर, सोमनाथ खालकर, रमेश शिंदे, ग्रामसेवक राखी बोन्द्रे, मदन चिखले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)
औरंगपूरच्या सरपंचपदी गायत्री शिंदे बिनविरोध
By admin | Updated: February 2, 2017 23:14 IST