शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

गवार १००, कारली ८० रु पये किलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 00:31 IST

उन्हाळ्याला सुरु वात झाली नाही तोच बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या सर्वच फळभाज्यांचे बाजारभाव गगनाला भिडल्याने सर्वसामान्य ग्राहकांना दोनवेळेचा हिरवा भाजीपाला खरेदी करताना खिशाचा विचार करावा लागत आहे.

पंचवटी : उन्हाळ्याला सुरु वात झाली नाही तोच बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या सर्वच फळभाज्यांचेबाजारभाव गगनाला भिडल्याने सर्वसामान्य ग्राहकांना दोनवेळेचा हिरवा भाजीपाला खरेदी करताना खिशाचा विचार करावा लागत आहे. पंचवटी परिसरात दैनंदिन भरणाऱ्या व आठवडे बाजारात विक्र ीसाठी येणाºया फळभाज्या खरेदीसाठी ग्राहकांना १०० रु पयांची नोटदेखील कमी पडत आहे.काही दिवसांपासून उन्हाळ्याला सुरु वात झाली आहे. उन्हाच्या झळा अजून वाढायचे असल्या तरी त्याआधीच फळभाज्यांचे दर गगनाला भिडल्याने सर्वसामान्य ग्राहक हवालदिल झाले आहेत. आठवडे बाजारात मेथी ३०, तर कांदापात २५, करडई १०, शेपू २० रु पये प्रति जुडी दराने विक्र ी होत आहे. फळभाज्यांमध्ये गवार १०० रु पये, तर कारली, दोडका ८० रु पये, टमाटा ४०, ढोबळी मिरची ६० रु पये किलो दराने विक्र ी होत आहे. फ्लावर कोबी १५ रु पये कंद प्रति दराने विक्र ी होत असल्याने सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. दैनंदिन भाजीपाल्यात आणणाºया हिरव्या मिरचीचे बाजार भावदेखील ८० रु पये किलो असल्याने ग्राहकांना मिरचीची चव तिखटच असे म्हणावे लागत आहे.भाजीबाजारात मेथी, शेपू, पालक, कांदा पात या हिरव्या भाज्यांसह टमाटा, काकडी, कोबी, फ्लॉवर, दोडका, गिलके, गवार, हिरवी, मिरची, कारली, ढोबळी मिरची यांसह अन्य फळभाज्या विक्र ीसाठी दाखल होत आहेत.उन्हाळ्यात शेतमालाला पाणी कमी पडत असल्याने बाजारभाव तेजीत येत असतात मात्र यंदाच्या वर्षी उन्हाळाच्या प्रारंभीपासूनच फळभाज्यांचे बाजारभाव गगनाला भिडल्याने सध्यातरी सर्वसामान्य ग्राहकांना रोजच्या जेवणात लागणारा भाजीपाला खरेदीसाठी खिशाचा विचार करावा लागत आहे.

टॅग्स :vegetableभाज्याMarketबाजार