शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

गावगुंडांचा पोलीस पथकावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 01:53 IST

नवीन सीबीएस बसस्थानकाच्या आवारात रविवारी (दि.९) रात्री ११.३० वाजेच्या सुमारास डझनभर गावगुंडांच्या टोळक्याने अंडाभुर्जी विक्री करणाऱ्या व्यावसायिकाला दमबाजी करत त्याच्या वाहनाची तोडफोड केली. यावेळी घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांच्या पथकावरही टोळक्याने लाकडी दंडुके, लोखंडी फावड्यांनी हल्ला चढवून एका पोलिसाला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

नाशिक : नवीन सीबीएस बसस्थानकाच्या आवारात रविवारी (दि.९) रात्री ११.३० वाजेच्या सुमारास डझनभर गावगुंडांच्या टोळक्याने अंडाभुर्जी विक्री करणाऱ्या व्यावसायिकाला दमबाजी करत त्याच्या वाहनाची तोडफोड केली. यावेळी घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांच्या पथकावरही टोळक्याने लाकडी दंडुके, लोखंडी फावड्यांनी हल्ला चढवून एका पोलिसाला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दोन दिवसांपूर्वी उपनगर पोलिसांच्या हद्दीत नारायणबापूनगर परिसरात टोळक्याने मध्यरात्री मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घालून सात वाहनांची तोडफोड केल्याचे समोर आले होते.शहरात गावगुंडांचा वाढता उपद्रव पोलिसांना केवळ आव्हान देणारा ठरत नसून त्यांच्या जिवावर बेतणाराही ठरत असल्याचे रविवारच्या घटनेनंतर समोर आले. नव्या मध्यवर्ती बसस्थानकाच्या परिसरात रात्री अंडाभुर्जी विक्री करणाºया अ‍ॅपेरिक्षावर दहा ते बारा संशयित हल्लेखोरांच्या टोळक्याने दमबाजी करत रिक्षाची तोडफोड करून नुकसान केले. या घटनेची माहिती सरकारवाडा पोलिसांना मिळताच रात्रगस्तीवर असलेल्या गुन्हे शोध पथकाच्या उपनिरीक्षक योगीता नारखेडे यांचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.हल्लेखोरांना पोलीस कोठडीशाहीर असाराम जावळे (२०), सोनू सुभाष कांबळे (२०), नितीन धुराजी हिवाळे (१९), सौरभ पाराजी पाथरे (२०), भीमा रामभाऊ पाथरे (२०), सुरज तुळशीराम लहाडे (२१), योगेश धुराजी हिवाळे (२३), अमोल पांडुरंग कोळे (२३), श्याम मच्छिंद्र चव्हाण (२१) यांच्यासह चार अल्पवयीन मुलांनाही (सर्व रा.भीमवाडी, गंजमाळ) अटक केली आहे. यापैकी संशयित शाहीर याने पोलीस सागर हजारी यांच्या डोक्यात लोखंडी फावडा मारल्याचे फिर्यादित म्हटले आहे. संशयितांना जिल्हा व सत्र न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने येत्या गुरुवारपर्यंत (दि.१३) पोलीस कोठडी सुनावली.गुन्हेगारांची वाढली मजलनाशिक शहर व परिसरात मागील काही दिवसांपासून वाढत्या गुन्हेगारीने नागरिक त्रस्त झाले आहे. पोलिसांवर हल्ला करण्यापर्यंत गावगुंडांची मजल वाढल्याने संताप व्यक्त होत आहे. टोळक्याने पोलिसांवर चाल करत लाकडी दंडुक्याने जखमी करणे ही गंभीर बाब आहे. याप्रकरणी १३ संशयितांच्या टोळक्यावर सरकारवाडा पोलीस ठाण्यात पोलीस प्रशांत रामदास मरकड यांच्या फिर्यादीवरून प्राणघातक हल्ला, दंगल माजविणे, शस्त्रबंदी कायद्याचे उल्लंघन करणे आदी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सर्व संशयितांना पोलिसांनी रात्रीतून अटक केली आहे. यामध्ये काही अल्पवयीन असून, काही सराईत गुन्हेगार आहेत. सर्व गंजमाळ परिसरातील भीमवाडी झोपडपट्टी भागातील असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिस