शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा चीनवर टॅरिफ बॉम्ब; धमकीनंतर कोसळला बाजार; अमेरिकेच्या शेअर बाजारात एप्रिलनंतरची मोठी घसरण
2
उद्धवसेनेच्या हंबरडा मोर्चाने छत्रपती संभाजीनगर दणाणले;  शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी १ लाख रुपये द्या - उद्धव ठाकरे
3
जागतिक अस्थिरतेने गुंतवणूकदार मालामाल! गेल्या चार वर्षांत किती वाढले सोने-चांदीचे भाव? जाणून डोळे फिरतील
4
तालिबानचा भेदभाव; काँग्रेसची सरकारवर टीका; महिला पत्रकारांना प्रवेश नाकारल्यावरून राजकारण
5
‘डिजिटल सोने’ घेत नव्या युगात पाऊल टाका 
6
 तालिबानचा पलटवार, अफगाणिस्तान-पाकिस्तान बॉर्डरवर भीषण संघर्ष, अनेक पोस्टवर कब्जा, ५ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू 
7
निवडणुका महायुती की स्वबळावर; निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिकांना, मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण
8
भाजपा, JDUने आपल्या जागा मित्रपक्षांना दिल्या, तरी NDAमधील तिढा सुटेना, नाराज मांझी म्हणाले..      
9
गाझा शांतता करारावर स्वाक्षरी करण्यास हमासचा नकार, ट्रम्प यांच्या प्रस्तावाची उडवली खिल्ली
10
भयानक! आधी प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला, मग त्याच चाकूने तिचा गळा चिरला
11
जोपर्यंत न्याय नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार होणार नाही, IPS पुरन कुमार यांच्या पत्नीची आक्रमक भूमिका
12
ENG W vs SL W : ...अन् श्रीलंकन कॅप्टनवर आली स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर जाण्याची वेळ; जाणून घ्या सविस्तर
13
माझ्या राजकीय कारकिर्दीत मी पाहिलेले पहिले हतबल मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे; बावनकुळेंची टीका
14
शेवटच्या चेंडूपर्यंत थरार, नामिबियाने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला हरवलं, सामन्यात नेमकं काय घडलं?
15
वयाने लहान तरुणाला घरी बोलावून ठेवायची शारीरिक संबंध, मग केली हत्या, महिलेला अटक
16
Nashik: "...शरीरसंबंध ठेव, अन्यथा तुझे फोटो व्हायरल करीन"; मुंबईत विवाहित मैत्रिणीचे व्हिडीओ काढले, घरी जाऊन केला बलात्कार
17
फ्रान्सच्या राजकारणात मोठी उलथापालथ, सेबॅस्टिन लेकोर्नू एका आठवड्यात दुसऱ्यांदा बनले पंतप्रधान
18
"उद्धवजी, हंबरडा राखून ठेवा, महापालिकेतील पराभवानंतर तुमच्या..."; शेलारांचे ठाकरेंना उत्तर
19
या उद्योगातील ५० हजार नोकऱ्या धोक्यात! हळूच जातील जॉब; हा आहे कंपन्यांचा प्लान
20
"राहुल गांधींची जशी अमेठीमध्ये अवस्था झाली होती, तशीच तेजस्वी यादवांची..."; प्रशांत किशोर यादवांच्या बालेकिल्ल्यातून फुंकणार रणशिंग

गौरव : महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा

By admin | Updated: July 23, 2014 00:25 IST

मालेगावातील चार लेखकांची निवड

 मालेगाव : महाराष्ट्र राज्य शासन उर्दू साहित्य अकादमीच्या सन २०१३च्या वार्षिक पुरस्कारांसाठी येथील चौघा लेखकांची निवड करण्यात आली आहे. पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबई येथे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते त्यांना समारंभपूर्वक हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.येथील प्रख्यात लेखक व उर्दू शायर डॉ. इलियास सिद्दिकी, मुख्याध्यापक व लेखक अश्पाक उमर, ए.टी.टी. हायस्कूलचे शिक्षक डॉ. एकबाल बर्की व लेखक जाहीद अख्तर यांची या पुुरस्कारांसाठी निवड झाली आहे. डॉ. सिद्दिकी यांना त्यांच्या ‘कंदील हर्फ’ या गझल व शेरोशायरीच्या पुस्तकासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. ‘मालेगावचा इतिहास’ लिहिणारे लेखक म्हणून सिद्दिकी यांचा परिचय आहे. येथील मनपा उर्दू शाळा क्रमांक ६४ चे मुख्याध्यापक अश्पाक उमर यांनी ‘रहनुमाई सिव्हिल सर्व्हिसेस’ हे केंद्रीय लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनसंदर्भातील पुस्तक उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी लिहिले आहे. त्यांच्या या पुस्तकाबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. विशेष म्हणजे मुख्याध्यापक उमर हे पुस्तकप्रेमी असून, त्यांच्याकडे गत शंभर वर्षांतील मराठी व उर्दू भाषेतील क्रमिक अभ्यासक्रमांची पुस्तके उपलब्ध आहेत. मुख्याध्यापक उमर यांची आतापर्यंत सात पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. तिसरे पुरस्कारार्थी हे येथील ए.टी.टी. हायस्कूलमधील माध्यमिक शिक्षक डॉ. एकबाल बर्की हे आहेत. त्यांच्या ‘उस्ताद की नसीहत’ या बालकादंबरीची यंदाच्या या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. सन २००९ मध्येही बर्की यांच्या ‘मोती’ या पुस्तकासही राज्य शासनातर्फे सदर पुरस्कार देण्यात आला होता. डॉ. बर्की यांची आतापर्यंत नऊ पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. चौथे पुरस्कारार्थी जाहिद अख्तर हे आहेत. त्यांनी गुलबुटे या मुंबईतील उर्दू बालमासिकातून उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विशेष लेखन केले. तसेच या मासिकातून विविध स्पर्धा परीक्षांविषयीची माहितीदेखील त्यांनी बालविद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेली आहे. त्यांच्या या कामगिरीची दखल घेऊन शासनाने त्यांची सदर पुरस्कारांसाठी निवड केली आहे.