शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटीमुळे ‘मराठी एकपडद्या’ला मिळेना प्रेक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 17:36 IST

देशभर जीएसटी अर्थात वस्तू व सेवाकर लागू झाल्यानंतर प्रामुख्याने एक पडदा चित्रपटगृहे अडचणीत सापडली असून, मराठी चित्रपटांचा सुमारे २० ते २५ टक्के प्रेक्षकवर्ग घटला असल्याचे चित्र दिसून येत आहे.

नाशिक : देशभर जीएसटी अर्थात वस्तू व सेवाकर लागू झाल्यानंतर प्रामुख्याने एक पडदा चित्रपटगृहे अडचणीत सापडली असून, मराठी चित्रपटांचा सुमारे २० ते २५ टक्के प्रेक्षकवर्ग घटला असल्याचे चित्र दिसून येत आहे. मराठी चित्रपटांसाठी रद्द करण्यात आलेले ‘टॅक्स फ्री’चे स्टेटस, तिकिटांवर लागू करण्यात आलेला १८ टक्के जीएसटी आणि देखभालीसाठी मिळणारा सर्व्हिस चार्जही काढून टाकण्यात आल्याने चित्रपटगृहचालक आर्थिक गर्तेत सापडले आहेत.दि. १ जुलैपासून ‘एक राष्टÑ एक कर’ याअंतर्गत जीएसटीची अंमलबजावणी सुरू झाली. आता जीएसटी लागू होऊन सव्वा महिन्याचा कालावधी लोटला आहे. या नवीन करप्रणालीमुळे मराठी चित्रपटांना प्रथमच तिकिटांवर १८ टक्के जीएसटी लागू करण्यात आला आहे. यापूर्वी, मराठी चित्रपट हे ‘करमुक्त’ होते. तसेच चित्रपटांच्या देखभालीसाठी तिकिटांच्या रकमेमधून सर्व्हिस चार्जची रक्कम चित्रपटगृह चालकांना दिली जायची. मात्र, जीएसटीमुळे ‘टॅक्स फ्री’ हे मराठी चित्रपटांचे स्टेटस रद्दबातल ठरविले गेले आहे आणि सर्व्हिस चार्जही बंद करण्यात आला आहे. त्यामुळे सिंगल स्क्रिन थिएटर्स म्हणजे एकपडदा चित्रपटगृहे अडचणीत सापडली आहेत.अगोदरच मराठी चित्रपट दाखविणाºया एकपडदा चित्रपटगृहांची संख्या कमालीची घटत चालली आहे. नाशिक शहरात १६ एकपडदा चित्रपटगृहे होती. सद्यस्थितीत अवघी तीन चित्रपटगृहे उरली असून, ती कशीबशी तग धरून आहेत. दोन चित्रपटगृहांचे मल्टिप्लेक्समध्ये रूपांतर झालेले आहे. मराठी चित्रपटांना गेल्या पाच-सात वर्षांत सुगीचे दिवस आले आहेत. मागील वर्षी ११५ मराठी चित्रपट सेन्सॉर झाले. त्यापैकी ८५ चित्रपट झळकले. सैराट, नटसम्राट यांनी तिकीटबारीवर उच्चांक प्रस्थापित केले. मराठी चित्रपटाला ‘अच्छे दिन’ येऊ पाहत असतानाच जीएसटीमुळे आता मराठी चित्रपट दाखविणाºया एकपडदा चित्रपटगृहांवर गंडांतर आले आहे. एकपडदा चित्रपटगृहात सर्वसामान्य रसिक चित्रपटांचा आस्वाद घेत असतो. परंतु, तिकिटाच्या दरात वाढ झाल्याने सामान्य माणसाच्या करमणुकीवरही गदा आली आहे. तिकिटांचे दर वाढल्यामुळे मराठी चित्रपटांचा प्रेक्षकवर्ग आणखी घटत चालल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे चित्रपटगृह चालविणाºया मालकांच्याही चिंता वाढल्या आहेत.मराठी चित्रपटांना पुन्हा करमुक्ती देण्यासाठी राज्य व केंद्र स्तरावर चित्रपटगृह मालकांची संघटना पाठपुरावा करत असली तरी अद्याप सरकारकडून मात्र कसलाही खुलासा झालेला नाही.