शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पाहणाºयांच्या पोटात उठतो गोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 00:16 IST

सिन्नर : आपल्या हाताच्या इवल्याशा मुठीत जगभराचे नेटवर्क उपलब्ध होण्यासाठी मोबाइल टॉवरची उभारणी करणाºया कष्टकरी मजुरांची जीवघेणी कसरत सिन्नर तालुक्यातील वावी येथे गुरुवारी (दि.१२) रस्त्यावरुन ये-जा करणाºया नागरिकांनी अनुभवली आणि पोटासाठी जीवघेण्या कळा सोसणाºया या मजुरांना पाहून बघ्यांच्याही पोटात क्षणभर गोळा उठला.

ठळक मुद्देकष्टकऱ्यांची चढाई : मोबाइल टॉवर उभारणाऱ्यांची कथा पोटासाठी ‘त्यांच्या’ जीवघेण्या कळा;

लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : आपल्या हाताच्या इवल्याशा मुठीत जगभराचे नेटवर्क उपलब्ध होण्यासाठी मोबाइल टॉवरची उभारणी करणाºया कष्टकरी मजुरांची जीवघेणी कसरत सिन्नर तालुक्यातील वावी येथे गुरुवारी (दि.१२) रस्त्यावरुन ये-जा करणाºया नागरिकांनी अनुभवली आणि पोटासाठी जीवघेण्या कळा सोसणाºया या मजुरांना पाहून बघ्यांच्याही पोटात क्षणभर गोळा उठला.तालुक्यातील वावी येथे विठ्ठल मंदिराजवळ एका खासगी कंपनीच्या मोबाईल टॉवर उभारणीचे काम सुरू झाले आहे. एका दिवसात पाच मजुरांनी सुमारे १०० फूट उंच टॉवर उभारणीचे काम पूर्ण केले. खाली दोन मजूर आणि टॉवर वर तीन मजूर यांची दिवस उगवल्यापासून ते मावळतीला येईपर्यंतची कसरत चालू होती. अक्षरश: जीवावर उदार होऊन टॉवर उभारणारे मजूर पाहून रस्त्याने ये- जा करणारे नागरिक कसरत पाहून अचंबित होत होते.सुमारे शंभर फूट उंचीवर गेलेल्या या मजुरांची पोटासाठी चाललेली कसरत पाहून तर पाहणाºयांच्या पोटात गोळा येत होता. कोणतेही सुरक्षिततचे साधन नसताना एवढ्या उंचीवरून त्यांची चाललेली कसरत जीवघेणीच होती. सध्या राष्टÑीय सुरक्षा सप्ताहानिमित्त विविध उपक्रम राबविले जात असताना या मजुरांच्या लेखी मात्र हा सप्ताह दूरच होता. सुरक्षिततेबाबत सर्वच गोष्टींची काळजी घेण्याचे आवाहन केले जाते, मात्र हे मजूर डोक्यात हेल्मेट नाही अथवा कोणतीही शाश्वत खबरदारीची उपाययोजना नसताना करत असलेले काम धोकादायक होतेच शिवाय, त्यांच्या कौशल्यालाही दाद देणारे होते. सर्वाना मोबाईल नेटवर्क मिळून संवाद अधिक सुकर व्हावा यासाठी मजुरांची ही जीवघेणी कसरत परिसरात चर्चेचा आणि कुतुहलाचा विषय बनली होती.

टॅग्स :sinnar-acसिन्नरHealthआरोग्य