शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मनमाड रेल्वेस्थानकात गॅसगळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 23:10 IST

मनमाड रेल्वेस्थानकात घडलेल्या घटनेनंतर पाहणी करताना अधिकारी. मनमाड : मुंबई येथील चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे रेल्वे प्रशासनाचा बेजबाबदारपणा चव्हाट्यावर आलेला असताना, आज मनमाड जंक्शन रेल्वेस्थानकावर फलाट क्रमांक सहावर असलेल्या छोट्या स्टॉलवरील सिलिंडरमधून गॅसगळती होऊन किरकोळ आग लागल्याने प्रवाशांची धावपळ उडाली.

मनमाड रेल्वेस्थानकात घडलेल्या घटनेनंतर पाहणी करताना अधिकारी.

मनमाड : मुंबई येथील चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे रेल्वे प्रशासनाचा बेजबाबदारपणा चव्हाट्यावर आलेला असताना, आज मनमाड जंक्शन रेल्वेस्थानकावर फलाट क्रमांक सहावर असलेल्या छोट्या स्टॉलवरील सिलिंडरमधून गॅसगळती होऊन किरकोळ आग लागल्याने प्रवाशांची धावपळ उडाली.येथील सहा नंबरच्या फलाटावर डोसा विक्री करणारा लहान स्टॉल असून, तपोवन एक्स्प्रेस फलाटावर आल्यानंतर प्रवाशांना गरम डोसा मिळावा यासाठी वेंडरने गॅस सुरू केला. मात्र अचानक सिलिंडरमधून गॅस गळती होऊन आग लागली. आग लागल्याचे पाहून डोसा घेण्यासाठी आलेल्या प्रवाशांनी पळ काढला, तर इतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. रेल्वे कर्मचाºयांनी तातडीने फायर बाटल्यांचा वापर करून काही क्षणातच आग आटोक्यात आणली. घटनेची माहिती मिळताच स्टेशन मास्तर पी. के. सक्सेना, सहायक स्टेशन मास्तर गरुड, मुख्य वाणिज्य निरीक्षक अनिल बागले, मुख्य तिकीट निरीक्षक एस.पी. कांबळे, आरपीएफ सबइन्स्पेक्टर रजनीश यादव, रेल्वे पोलीस निरीक्षक एन. के. मदने यांच्यासह इतर अधिकाºयांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. तातडीने आग आटोक्यात आणल्यामुळे सुदैवाने जीवित अथवा मालमत्तेची हानी झाली नाही. या प्रकरणी रेल्वे पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.

मनमाड रेल्वेस्थानकाचे सुरक्षा आॅडिट करण्यात यावे अशी मागणी रेल्वे प्रशासनाकडे करूनही दखल घेण्यात आलेली नाही. आजची घटना गंभीर असून, त्यास जबाबदार असणाºया अधिकाºयांवर कारवाई करण्यात यावी. - नितीन पांडे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष