शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

मखमलाबादला उद्यानाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 01:08 IST

मखमलाबाद येथील मानकरनगर येथील उद्यानाची दुरवस्था झाली असून, महानगरपालिकेकडून दुर्लक्ष होत आहे. महापालिकेने लाखो रु पये खर्च करून नागरिकांच्या सोयीसाठी व मुलांना खेळण्यासाठी मानकरनगर येथे उद्यानाची निर्मिती केली आहे.

मातोरी : मखमलाबाद येथील मानकरनगर येथील उद्यानाची दुरवस्था झाली असून, महानगरपालिकेकडून दुर्लक्ष होत आहे. महापालिकेने लाखो रु पये खर्च करून नागरिकांच्या सोयीसाठी व मुलांना खेळण्यासाठी मानकरनगर येथे उद्यानाची निर्मिती केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून परिसरातील एकमेव उद्यान असल्याने याठिकाणी येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. सायंकाळी परिसरातील नागरिक निवांतपणासाठी तर ज्येष्ठ नागरिक विरंगुळा म्हणून आणि लहान बालके येथे खेळण्यासाठी येत असतात, परंतु उद्यानाच्या बकालपणामुळे त्रस्त असलेल्या स्थानिक नागरिकांनी अनेकदा याबाबत महानगरपालिका कार्यालयात तक्र ार करूनही दुर्लक्ष करत असल्याची माहिती नागरिकांनी दिली.  उद्यानात असलेल्या विहिरीला पुरेशा प्रमाणात पाणी असूनदेखील झाडांना पाणी नसल्याने झाडे पूर्ण वाळून गेली आहेत. पावसाळ्यानंतर उद्यानातील शोभेच्या व इतर वृक्षांना कोठेही पाणी दिल्याचे दिसत नाही, लॉन संपूर्ण वाळून गेली आहे. झाडांची मोडतोड झालेली आहे. त्यासाठी कोठेही सुरक्षा रक्षक किंवा माळी याची नेमणूक केलेली नाही. कंपाउंडची जाळी तोडलेल्या अवस्थेत आहे, तर खेळणींची अवस्था गंभीर झाली असून, पालक बालकांना खेळण्यास मज्जाव करीत आहेत. कारण खेळणी गंजल्याने खेळणे केव्हाही जिवावर बेतू शकते. याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी होत आहे़परिसरातील नागरिकांमध्ये नाराजीगेल्या सहा महिन्यांपासून साचलेला कचरा अजूनही उचलेला नाही. अनेकदा मागणी करूनही बसण्यास बाक उपलब्ध होऊ शकले नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे उद्यानाच्या समोरच लोकप्रतिनिधींचे निवासस्थान असून, ते उद्यानातील मंदिरात देवदर्शनासाठी येतात तरी देखील त्यांना ही दुरवस्था दिसत नाही का? असा प्रश्न नागरिक करीत आहे. याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे़

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक