शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक शाखेला  गणपती बाप्पा पावले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 00:03 IST

१ सप्टेंबरपासून निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या मतदार पुनरीक्षण मोहिमेत गणेशोत्सव काळात करण्यात आलेल्या व्यापक प्रचार व प्रसाराच्या निमित्ताने जिल्ह्यात गेल्या २३ दिवसांत २२ हजार नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली असून, सरासरी दिवसाला एक हजार याप्रमाणे मतदारांच्या संख्येत वाढ होत असल्याने निवडणूक शाखेची उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे.

नाशिक : १ सप्टेंबरपासून निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या मतदार पुनरीक्षण मोहिमेत गणेशोत्सव काळात करण्यात आलेल्या व्यापक प्रचार व प्रसाराच्या निमित्ताने जिल्ह्यात गेल्या २३ दिवसांत २२ हजार नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली असून, सरासरी दिवसाला एक हजार याप्रमाणे मतदारांच्या संख्येत वाढ होत असल्याने निवडणूक शाखेची उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे.  निवडणूक आयोगाने १ सप्टेंबर रोजी प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली असून, या याद्या मतदारांना अवलोकनासाठी प्रत्येक तहसील, निवडणूक शाखा, मतदार केंद्रावर ठेवण्यात आल्या आहेत. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका लक्षात घेता आयोगाने १ सप्टेंबरपासूनच मतदार पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यास सुरू केली असून, त्यात मतदार जागृती, नवीन मतदारांची नोंदणी, नाव, पत्त्यात बदल, मतदार यादीत छायाचित्र समाविष्ट करण्यात येणार आहे.  विशेष करून जानेवारी २०१९ मध्ये वयाची अठरा वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांची संख्या वाढविण्याचा विचार आयोगाचा असून, त्यासाठी महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यासाठी प्रत्येक महाविद्यालयात मतदार नाव नोंदणीचे अर्ज ठेवण्यात आले आहेत. जिल्ह्यात ६७ महाविद्यालयांची त्यासाठी निवड करण्यात आली. याशिवाय मतदार जागृती चित्ररथ फिरविला जात असल्याने गणेशोत्सव काळात सार्वजनिक मित्रमंडळांनीही राष्टय कर्तव्य म्हणून मतदार जागृतीला हातभार लावला आहे.  गेल्या तेवीस दिवसांत जिल्ह्यात २२ हजार नवीन मतदारांनी आपले अर्ज भरून दिले आहेत. यात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, सध्या निवडणूक नोंदणी अधिकारी प्रत्येक महाविद्यालयाशी संपर्क ठेवून आहेत, त्यामुळे ३१ आॅक्टोबरपर्यंत मतदारांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयElectionनिवडणूक