शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

स्टॅण्डअप कॉमेडीमध्ये गांगुर्डे विजेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 00:32 IST

पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सांस्कृतिक संचालनालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या स्टॅण्डअप कॉमेडी स्पर्धा २०१९ मध्ये नाशिक विभागातून अर्चना गांगुर्डे यांनी विजेतेपद, तर उमेश सोनवणेने उपविजेतेपद पटकावले आहे.

नाशिक : पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सांस्कृतिक संचालनालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या स्टॅण्डअप कॉमेडी स्पर्धा २०१९ मध्ये नाशिक विभागातून अर्चना गांगुर्डे यांनी विजेतेपद, तर उमेश सोनवणेने उपविजेतेपद पटकावले आहे. दोन्ही विजेत्यांना सांस्कृतिक संचालक मीनल जोगळे व प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांच्या हस्ते पारितोषिक व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.रावसाहेब थोरात सभागृहात सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु.ल. देशपांडे यांच्या साहित्यावर आधारित एकपात्री अभिनय स्पर्धा रंगली. १२ वर्ष आणि त्यापुढील वयोगटातील स्पर्धकांसाठी ही स्पर्धा महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांत घेण्यात येणार असून नाशिकपासून या स्पर्धेची सुरुवात झाली. मविप्रचे संचालक नानासाहेब महाले, सांस्कृतिक संचालनालयाच्या संचालक मीनल जोगळेकर, कार्यक्रम अधिकारी संदीप शेंडे, परीक्षक अनिल सोनार, संजय कळमकर, श्याम राजपूत यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन झाले. नाशिकमधून एकूण २२ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. यात पुढारी पाहिजे या वगनाट्यातील प्रसंगातील कवी आणि रोंगट्या यांच्यातील ग्रामीण शैलीतील संवाद सादर करीत विजेतेपद पटकविणाऱ्या अर्चना गांगुर्डे यांना २० हजार रुपये रोख व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले, तर वटवट या विनोदी लेखातील अण्णा आणि भाचा यांच्यातील संवादाच्या प्रसंग सादर करीत उपविजेतेपद पटकविणाºया उमेश सोनवणे याला १५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.कलाकारांच्या धम्माल सादरीकरणाने रंगतएकांकिका, नाटक, कथा, ललितलेख अशा पुलंच्या साहित्यावर आधारित फुलराणी नारायण, वटवट्या अशी पात्रे कलाकारांनी रंगवली, तर काही कलाकारांनी पुलंची कविता समजून दुसºयाच साहित्यिकाची कविता सादर केली. त्यावर परीक्षकांनी निरीक्षण नोंदवत कलाकारांनी कलाकृतीचे सादरीकरण करताना केवळ सोशल मीडियावरील कविता अथवा कलाकृतीचा आधार न घेता स्वत: वाचन करून साहित्यातील प्रसंग निवडण्याचा सल्ला दिला.

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashikनाशिक