शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

गंगापूर धरणातून विसर्ग पूर्णपणे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 01:18 IST

नाशिक : आठवडाभरापासून नाशिक शहरासह जिल्ह्णात पावसाचा जोर ओसरला आहे. जिल्ह्णातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी या सर्वाधिक पर्जन्यमान असलेल्या तालुक्यांमध्येही आता वरुणराजा रुसला आहे. गंगापूर धरणाचा जलसाठा ७६.४५ टक्के इतका असून ४ हजार ३०४ दलघफूपर्यंत जलपातळी पोहचली आहे. पावसाने धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रात विश्रांती घेतल्याने विसर्ग आता पूर्णपणे थांबविण्यात आला आहे.

ठळक मुद्देपावसाची दडी : धरणातील जलसाठा ७६.४६ टक्क्यांवर

 

 

नाशिक : आठवडाभरापासून नाशिक शहरासह जिल्ह्णात पावसाचा जोर ओसरला आहे. जिल्ह्णातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी या सर्वाधिक पर्जन्यमान असलेल्या तालुक्यांमध्येही आता वरुणराजा रुसला आहे. गंगापूर धरणाचा जलसाठा ७६.४५ टक्के इतका असून ४ हजार ३०४ दलघफूपर्यंत जलपातळी पोहचली आहे. पावसाने धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रात विश्रांती घेतल्याने विसर्ग आता पूर्णपणे थांबविण्यात आला आहे.पावसाचे प्रमाण शहरासह जादा पर्जन्यमान असलेल्या तालुक्यांमध्येही घटले असून, शहरात पूर्णपणे पावसाने विश्रांती घेतली आहे. सोमवारपर्यंत ४०० ते ५०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग गंगापूरमधून केला जात होता; मात्र जलसंपदा विभागाने बुधवारी (दि.१) हा विसर्गही पूर्णपणे बंद केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गंगापूर धरणातून शहराला पाणीपुरवठा केला जातो. तसेच अहमदनगर जिल्ह्णातील काही तालुक्यांनाही पाणी पुरविले जाते. हे धरण ७६ टक्के भरले असून, पाण्याची आवक धरण समूहात थांबल्याने गंगापूर धरणाचा विसर्ग पूर्णत: बंद करण्यात आला आहे. गंगापूर धरण समूहात काश्यपी, गौतमी, अंबोली ही लहान धरणे आहेत. या धरणांमधून गंगापूर धरणात सुरू असलेला पाण्याचा प्रवाहही पूर्णपणे थांबविला गेला आहे. काश्यपी धरण ८५ टक्के, गौतमी धरण ७१.३८ टक्के भरले आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बुधवारी पहाटे सहा वाजेपर्यंत २४ तासांत ०.५ मिमी पावसाची नोंद झाली. अंबोलीच्या परिसरात १६, त्र्यंबकेश्वरमध्ये ०.२ मिमी इतका पाऊस झाला. यावरून पावसाचे प्रमाण अचानकपणे कमी झाल्याने चिंता व्यक्त होत आहे.शहर व परिसरात आठवडाभरापासून पावसाने उघडीप दिली आहे. दुपारी किंवा संध्याकाळच्या सुमारास शहरात ढग दाटून येत असले तरी पावसाच्या सरींचा वर्षाव होत नाही. शहरात या हंगामात अद्याप ४३१ मिमी इतका पाऊस झाल्याची नोंद हवामान केंद्राकडे आहे.