शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

गंगापूर एसटीपीचा तिढा सुटला सुनावणी पूर्ण: पालिकेकडून साडेसात कोटी जमा

By admin | Updated: May 22, 2014 00:21 IST

नाशिक : गोदावरी नदीचे प्रदूषण थांबविण्यासाठी आवश्यक गंगापूर येथील एसटीपी म्हणजेच मलनिस्सारण केंद्राचा मार्ग जवळजवळ मोकळा झाला आहे. जागा मालकाला देण्यासाठी साडेसात कोटी रुपयांची रक्कम महापालिकेने जिल्हा प्रशासनाकडे जमा झाली आहे. त्याचबरोबर नासर्डीतील प्रदूषण थांबविण्यासाठी पिंपळगाव खांब येथील मलनिस्सारण केंद्रासाठी सहा कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.

नाशिक : गोदावरी नदीचे प्रदूषण थांबविण्यासाठी आवश्यक गंगापूर येथील एसटीपी म्हणजेच मलनिस्सारण केंद्राचा मार्ग जवळजवळ मोकळा झाला आहे. जागा मालकाला देण्यासाठी साडेसात कोटी रुपयांची रक्कम महापालिकेने जिल्हा प्रशासनाकडे जमा झाली आहे. त्याचबरोबर नासर्डीतील प्रदूषण थांबविण्यासाठी पिंपळगाव खांब येथील मलनिस्सारण केंद्रासाठी सहा कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.महापालिकेने गंगापूर येथील मलनिस्सारण केंद्राची पाच एकर जागा ताब्यात घेण्यासाठी कार्यवाही सुरू केली असताना जागा मालकाने न्यायालयात दाद मागितल्याने हा विषय रखडला होता. सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात राज्यशासनाने जागा मालकांचे म्हणणे ऐकून निर्णय घ्यावा, असे आदेशित केले. त्यानुसार जागा मालकाचे म्हणणे ऐकून घेण्यात आले असून, आता केवळ जिल्हाधिकार्‍यांच्या अंतिम निर्णयाची प्रतीक्षा आहे. दरम्यान गोदावरी गटारीकरण विरोधी मंचाने गोदावरी प्रदूषणाबाबत उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेच्या आधारे उच्च न्यायालयाने महापालिकेला गंगापूर आणि पिंपळगाव खांब येथील मलनिस्सारण केंद्रासंदर्भात कालबद्ध कार्यक्रम दिला आहे. त्यात आता गंगापूर येथील जागेसाठी महापालिकेच्या मिळकत विभागाने ७ कोटी ५२ लाख रुपये जिल्हा प्रशासनाकडे जमा केले आहे. तसेच पिंपळगाव खांब येथील ५ हेक्टर जागेसाठी ५ कोटी ९१ लाख रुपये जिल्हा प्रशासनाकडे जमा केले आहेत. त्यामुळे लवकरच या जागा महापालिकेच्या ताब्यात येण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे मिळकत व्यवस्थापक बी. यू. मोरे यांनी सांगितले.दीड वर्षात बांधकामगंगापूर येथील जागा पालिकेच्या ताब्यात आल्यानंतर दीड वर्षात १८ दशलक्ष लिटर्स क्षमतेच्या केंद्राचे बांधकाम पूर्ण होईल. त्यानंतर २०२६ मध्ये आणखी १८ दशलक्ष लिटर्स क्षमतेच्या केंद्राचे बांधकाम सुरू होईल. पिंपळगाव बसवंत येथे पहिल्या टप्प्यात ३२ दशलक्ष लिटर्स क्षमतेचे तर पंधरा वर्षांनी आणखी तितक्याच क्षमतेचे बांधकाम पूर्ण होणार आहे.- उत्तम पवार, अधीक्षक अभियंता, भुयारी गटार योजना