शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण ‘गंगापूर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 00:58 IST

सुधीर कुलकर्णी नाशिक : नाशिक शहरापासून अवघ्या १५-१६ कि.मी. अंतरावर असलेले गंगापूर धरण हे महाराष्ट्रातील अनोखे आणि अवघे एकमेव ...

ठळक मुद्दे २३,१३१ हेक्टर क्षेत्र व १६,५०५ हेक्टर शेतजमिनीचे क्षेत्र ओलिताखाली आले आहे.

सुधीर कुलकर्णीनाशिक : नाशिक शहरापासून अवघ्या १५-१६ कि.मी. अंतरावर असलेले गंगापूर धरण हे महाराष्ट्रातील अनोखे आणि अवघे एकमेव मातीचे धरण आहे. शहराची तहान भागविणारे हे गंगापूर धरण आहे. त्याबरोबरच आसपासच्या तालुका व गावांतील शेतीकरिता या धरणातूनच पाणीपुरवठा केला जातो. सिंचन आणि जलविद्युत निर्मिती हा धरण बांधण्याचा मुख्य उद्देश होता. गोदावरी नदीवर हे धरण बांधण्यात आले आहे. केवळ मातीचा भराव टाकून बांधलेल्या या धरणाला ९ भव्य दरवाजे असून, त्याची उंची १०१.८३ मीटर असून पावसाळ्यात धरणात क्षमतेपेक्षा अधिक जलसाठा झाल्यावर आणि त्यानंतर शेतीकरिता आवश्यकतेनुसार रोटेशन पद्धतीने सदर दरवाजांद्वारे गंगापूर धरणातून पाणी सोडण्यात येते.या धरणाचे काम सुमारे १७ वर्षे सुरू होते. १९४८ मध्ये गंगापूर धरणाच्या कामाचा शुभारंभ झाला आणि १९६५ मध्ये या धरणाचे उद‌्घाटन होऊन ते कार्यान्वित करण्यात आले.शेकडो तज्ज्ञ आणि कामगारांच्या मदतीने अहोरात्र झटलेल्यांच्या परिश्रमांतून उभारलेल्या गंगापूर धरणाची उंची सर्वोच्च अशी ४४.२० मीटर म्हणजे १२० फूट, तर लांबी ३,८०० मीटर म्हणजे १२,८०२ फूट एवढी आहे. धरणाला ५६ वर्षे झाली असून, धरणातील गाळ वाढल्याने ही उंची व पाणी साठवण क्षमता काही प्रमाणात कमी झाली आहे. काही वर्षांपूर्वी नाशिक महानगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत गंगापूर धरणातील गाळ काढण्यासाठी शेतकऱ्यांना ‌थेट धरणातून मोफत गाळ काढून नेण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, बराच गाळ शेतकऱ्यांनी नेल्यामुळे पुन्हा काही प्रमाणात धरणातील पाणीसाठ्याची क्षमता वाढल्याचे बोलले जात होते. येथील पाण्याद्वारे ०.५० मेगावॅट वीज निर्मिती केली जाते.गंगापूर धरणातील पाणीसाठा क्षेत्रफळ २२.८६ वर्ग कि.मी. असून, क्षमता २१५.८ दशलक्ष घनमीटर आहे. त्यापैकी २०३.८ दशलक्ष घनमीटर वापरण्यायोग्य पाणीसाठा आहे. २,२८६ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली असून, त्यामध्ये ११० गावे आलेली आहेत. या धरणांतर्गत ६० कि.मी. लांबीचा ८.९२ घनमीटर क्षमतेचा डावा कालवाआणि ३० कि.मी. म्हणजे ३.६८ घनमीटर क्षमतेचा उजवा कालवा येतो. त्याद्वारे २३,१३१ हेक्टर क्षेत्र व १६,५०५ हेक्टर शेतजमिनीचे क्षेत्र ओलिताखाली आले आहे.प्रेक्षणीय स्थळ...गंगापूर धरणाचा परिसर अतिशय विलोभनीय असा आहे. याठिकाणी परवानगीशिवाय जाता येत नाही.धरणाच्या बॅकवॉटरला नव्याने बोटिंग क्लब सुरू करण्यात आल्याने निर्सगप्रेमींची गर्दी वाढत आहे. सध्या मात्र कोरोनामुळे सर्व यंत्रणा ठप्प झाली आहे, तसेच काही धनाढ्यांनी जमिनी खरेदी करत टुमदार बंगले बांधले असून, त्यावरूनदेखील वाद निर्माण झाले होते.

टॅग्स :gangapur damगंगापूर धरणWaterपाणी