शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

ओडिसातील गांजा तस्कर पोलिसांच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 01:03 IST

महाराष्ट्रातील अवैध व्यावसायिकांना गांजाचा पुरवठा करणाऱ्या संशयितास नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने ओडिसातून ताब्यात घेतले आहे. नाशिकसह, सिन्नर, धुळे, नागपूर येथील अवैध व्यावसायिकांना हा संशयित गांजा पुरवत असल्याचे वृत्त आहे.

नाशिक : महाराष्ट्रातील अवैध व्यावसायिकांना गांजाचा पुरवठा करणाऱ्या संशयितास नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने ओडिसातून ताब्यात घेतले आहे. नाशिकसह, सिन्नर, धुळे, नागपूर येथील अवैध व्यावसायिकांना हा संशयित गांजा पुरवत असल्याचे वृत्त आहे. ओडिसातून नाशिकसह महाराष्ट्रातील विविध भागांत गांजाची तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून, ओडिसातून ताब्यात घेतलेल्या आरोपीला रविवारी (दि.१७) सायंकाळपर्यंत नाशिकला आणण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.  आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने काही दिवसांपूर्वी एका ट्रकमधून ६८० किलो गांजा जप्त केला होता. याप्रकरणी दोघांना अटक करून त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला असून, त्यानंतरच्या तपासात सिन्नर तालुक्यात विकलेला सुमारे ३९० किलो गांजा जप्त करण्यात पोलिसांना यश आले होते. तसेच एका संशयितालाही अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केली असता हा गांजा ओडिसातून आणल्याचे उघडकीस आल्याने पोलिसांचे एक पथक ओडिसाला अधिक तपासासाठी गेले होते. ओडिसातील स्थानिक पोलिसांच्या मदतीने नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने गांजा तस्करांची चौकशी करून अकबर नामक संशयितास ताब्यात घेतले आहे.अकबर हा महाराष्ट्रातील अवैध व्यावसायिकांना गांजा पुरवत असल्याचे तपासातून समोर आले असून, त्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आल्याने नाशिकसह संपूर्ण राज्यातील गांजा तस्करांची पाळेमुळे शोधून काढण्यास पोलिसांना मदत होणार आहे. दरम्यान, गांजा तस्करीमध्ये नाशिक जिल्ह्णातील काही सराईत गुन्हेगारांचा सुगावा पोलिसांना लागला असून, त्यांचाही पोलीस शोध घेत आहेत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय