शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावर दरोडा टाकणारी टोळी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 00:56 IST

पंचवटी : रात्रीच्या अंधारात राज्य व राष्ट्रीय महामार्गावर दबा धरून मालवाहू वाहनांना दुचाकींच्या सहाय्याने रोखत ट्रक-कंटेनर चालकांना शस्त्रांचा धाक दाखवून जबरी लूट करणाऱ्या टोळीचा पंचवटी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी दरोडा टाकणाऱ्या टोळीतील सहा संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ठळक मुद्देअर्धा डझन संशयित ताब्यात : सीसीटीव्ही फुटेजद्वारे लावला सुगावा

पंचवटी : रात्रीच्या अंधारात राज्य व राष्ट्रीय महामार्गावर दबा धरून मालवाहू वाहनांना दुचाकींच्या सहाय्याने रोखत ट्रक-कंटेनर चालकांना शस्त्रांचा धाक दाखवून जबरी लूट करणाऱ्या टोळीचा पंचवटी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी दरोडा टाकणाऱ्या टोळीतील सहा संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.मंगळवारी (दि.२३) पहाटे दिंडोरी तालुक्यातील आशेवाडीत एका ट्रकचालकाला दरोडेखोरांनी शस्त्राचा धाक देत रोकड तसेच मोबाईल लुटले व संशयित दुचाकीवरून नाशिक शहराकडे येत असल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाकडून मिळाली. त्यानंतर रात्रगस्तीवर असलेले वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भागत यांनी गुन्हे शोध पथकाला ह्यॲलर्ट कॉलह्ण देत सापळा रचण्यास सांगितले.

त्यानंतर संशयित अन्य मार्गाने पळून जाण्याची शक्यता लक्षात घेत पंचवटी पोलिसांनी एका पथकाला आशेवाडीच्या दिशेने रवाना केले. दरम्यान, एका बोलेरो जीपच्या चालकाने पोलीस वाहनाला बघताच त्यांना थांबण्याचा इशारा करत रस्त्यावर थांबिवले. या जीपचालकाने पोलिसांच्या पथकाला त्याच्यासोबत घडलेल्या लुटीचा थरार सांगितला. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून तेथील जवळपास असलेल्या हॉटेलचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले त्यात दरोडेखोर दिसून आले. टोळीत सराईत गुन्हेगार नकुल परदेशी असल्याचे कर्मचारी विलास चारोस्कर यांनी ओळखले त्यानंतर तत्काळ तपासचक्रे फिरवून पोलिसांनी सिडकोतून चौघांना ताब्यात घेत चौकशी केल्यावर वाहनचालकांची लूट केल्याचे संशयितांनी कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या संशयितांविरुध्द यापुर्वीही म्हसरुळ, अंबड, दिंडोरी पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल असल्याचे सुत्रांनी सांगितले.....अशी आहे गुंडांची टोळीसंशयित नकुल रवींद्र परदेशी (२१,रा.हेडगेवारनगर, त्रिमुर्ती चौक), गौरव अरुण माळी, (२१, परदेशी चाळ, हनुमानवाडी), मयूर रत्नाकर पाचोरे (२५, रा.मेहेरधाम पेठरोड), प्रणव विनोद शेवाळे (१९,रा. कामटवाडे, सिडको), शुभम राजू पाटील (२१, रा.श्रीकृष्ण चौक सिडको), निलेश मदन गर्दे (२२, रा.मटाले फार्म, सिडको) या सहा संशयितांच्या टोळीला बेड्या ठोण्यास पोलिसांना यश आले आहे. त्यांना पुढील गुन्ह्याच्या तपासासाठी म्हसरुळ पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.

टॅग्स :ThiefचोरPolice Stationपोलीस ठाणे