शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

चालत्या रेल्वेत प्रवाशांच्या हातातील मोबाईल चोरणाऱ्या टोळीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 18:34 IST

इगतपुरी : मध्यरेल्वेच्या तपोवन एक्सप्रेस व इतर ट्रेनमध्ये घुसून प्रवाशांच्या हाताला झटका देत इगतपुरी दरम्यान मोबाईल चोरी करणाºया टोळीला इगतपुरी रेल्वे पोलिसांनी शिफारतीने अटक केली असून त्यांच्याकडून जवळपास दोन लाख रु पये किमतीचे मोबाईल हस्तगत केले आहे.

ठळक मुद्देइगतपुरी : इगतपुरी रेल्वे पोलिसांची कारवाई ; तिघे ताब्यात

लोकमत न्युज नेटवर्कइगतपुरी : मध्यरेल्वेच्या तपोवन एक्सप्रेस व इतर ट्रेनमध्ये घुसून प्रवाशांच्या हाताला झटका देत इगतपुरी दरम्यान मोबाईल चोरी करणाºया टोळीला इगतपुरी रेल्वे पोलिसांनी शिफारतीने अटक केली असून त्यांच्याकडून जवळपास दोन लाख रु पये किमतीचे मोबाईल हस्तगत केले आहे.रेल्वेने प्रवास करणारे अनेक प्रवासी इगतपुरीतील निसर्गरम्य देखावे व कसारा घाटातील धबधबे आपल्या मोबाईल कॅमेरात टिपण्यासाठी गाडीच्या दरवाजा व खिडकीतुन हातात मोबाईल धरून फोटो व चित्रीकरण करतात. अशा प्रवाशांच्या हातावर काठीने किंवा धारदार शस्त्राने फटका मारून मोबाईल चोरी करणाºया अनेक टोळ्या कार्यरत झाल्या असुन आज पर्यंत हजारो प्रवाशांचे मोबाईल चोरीस गेले आहेत.मात्र बरेच प्रवाशी लांब पल्लाचा प्रवास असल्याने व गाडी जास्त वेळ थांबत नसल्याने तक्र ार देत नाहीत. त्यामुळे या टोळयांचे चांगलेच फावले आहे.याबाबत रेल्वे पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की तुषार रमेश पवार, राहणार दिंडोरीरोड, नाशिक. हे तपोवन एक्सप्रेसच्या जनरल डब्यात बसून नांदेड ते मुंबई असा प्रवास करीत असताना इगतपुरी येण्याचे अगोदर बोरटेंभे पुलाजवळ सदर ट्रेन हळुजात असताना, चोरट्यांनी पवार यांच्या हाताला झटका देऊन त्यांचा मोबाईल पळविला.याबाबत त्यांनी इगतपुरी रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. रेल्वे पोलिस व त्यांच्या गुन्हे शोध पथकाने तपास मोहीम राबविली त्यात राहुल रमेश साळवे, (मिलिंद नगर इगतपुरी, सध्या रा. घोटी), ललित सदाशिव मोरे (मिलिंद नगर, इगतपुरी), विशाल दत्ता आतकरी (बोरटेंभे, इगतपुरी) या तिघाना रेल्वे पोलिसांनी अटक करून कस्टडी देण्यात आली.त्यांच्याकडून नोकीया, सॅमसंग, ओपो, विवो, एमआय, लावा, रियलमी आदी कंपनीचे सुमारे १६ मोबाईल (अंदाजे किंमत दोन लाख) व शस्त्र हस्तगत करण्यात आले. संशयितांपैकी राहुल साळवे याच्यावर घोटी पोलीस ठाणे, इगतपुरी पोलीस ठाणे व इगतपुरी रेल्वे पोलिसात अनेक गुन्हे दाखल आहेत.लोहमार्ग पोलिस अधिक्षक वैभव कलूबर्मे, मनमाड रेल्वे उपअधीक्षक विलास मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली, इगतपुरी रेल्वे पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक सुधीर पाटील यांच्यासह उपनिरीक्षक मुरारी गायकवाड, हेमंत घरटे, अंबादास कातोरे, दीपक निकम, दिपक निकम, सतीश खर्डे आदींनी या तपासकामी परिश्रम घेतले असून पुढील तपास करत आहे.प्रवाशांनी रेल्वेतुन प्रवास करतांना दाराजवळ ऊभे राहुन किंवा खिडकीतुन हातात मोबाईल घेऊन फोटो अथवा शुटींग करू नये.ङ्क्त- सुधीर पाटील, सहायक पोलीस निरीक्षक, लोहमार्ग पोलीस ठाणे.

टॅग्स :MobileमोबाइलCrime Newsगुन्हेगारी