शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

वाहने चोरणाºया टोळीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 00:58 IST

मालेगाव : मुंबई-आग्रा महामार्गावर टेहरे शिवारात छेºयाच्या बंदुकीचा धाक दाखवून चारचाकी (पिकअप) चोरून नेणाºया व स्पेअर पार्टची विक्री करणाºया पाच जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन महिंद्रा पिकअप, स्पेअर पार्ट असा १३ लाख ६२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ठळक मुद्देमालेगाव : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : मुंबई-आग्रा महामार्गावर टेहरे शिवारात छेºयाच्या बंदुकीचा धाक दाखवून चारचाकी (पिकअप) चोरून नेणाºया व स्पेअर पार्टची विक्री करणाºया पाच जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन महिंद्रा पिकअप, स्पेअर पार्ट असा १३ लाख ६२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.१८ जानेवारी रोजी नारायणी ट्रान्सपोर्टचे चालक कृष्णकुमारसिंग चंद्रशेठसिंग, रा. सुलतानपूर, उत्तरप्रदेश हे महिंद्रा कंपनीची नवीन पिकअप डिलिव्हरी देण्यासाठी मुंबई-आग्रा महामार्गावरून नाशिककडून धुळेकडे जात असताना टेहरे शिवारात कारमधून आलेल्या अज्ञात चौघा आरोपींनी पिकअप चालकाला छेºयाचा बंदुकीचा धाक दाखवून ५ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा पोलीस प्रमुख आरती सिंह, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपासाची चक्रे गतिमान केली होती.गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी चांदवड येथील गोरख अशोक गांगुर्डे याला ताब्यात घेतले होते. त्याला पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर सुनिल गोविंद डगळे रा. खेडगाव, ता. दिंडोरी, रोहित जयराम गांगुर्डे, रा. औताळे, ता. दिंडोरी, निरंजन तुळशिराम मंगळे रा. ओझर टाऊनशिप या चौघांनी पिकअप चोरल्याची कबुली दिली.पोलिसांनी चोरीसाठी वापरलेली व्हॅन, स्पेअरपार्ट, दोन महिंद्रा पिकअप असा १३ लाख ६२ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मुकेश गुजर, सहायक पोलीस उपनिरीक्षक अरुण पगारे, हवालदार संजय गोसावी, हेमंत गिलबिले, मंगेश गोसावी, सुशांत मरकड, सचिन पिंगळ, प्रदीप बहिरम, संदिप लगड, भूषण रानडे आदिंनी ही कारवाई केली.पिकअपचे स्पेअर पार्ट विकल्याचे तपासात उघडगोरख गांगुर्डे व सुनील डगळे हे दिंडोरी व निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांचा शेतमाल मार्केटला विक्री करण्यासाठी पिकअपवर चालक म्हणून काम करीत होते. या दोघांनी महिंद्रा कंपनीचे परराज्यात जाणारी वाहन चोरण्याची योजना आखली होती. चोरलेल्या पिकअपचे स्पेअर पार्ट संशयित आरोपींनी आपसात वाटून घेतली होती. त्यापैकी गाडीची ट्रॉली अनिल विष्णू चौरे, रा. शिरसगाव, ता. निफाड यांना विकल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी विष्णू चौरे यांना ताब्यात घेतले आहे. तसेच सुनील डगळे यांनी चोरी केलेले पिकअप गाडीचे टायर व डिस्क त्याच्या मालकीच्या पिकअप (क्र. एमएच १५ जीव्ही ५४३७) या वाहनाला बसविल्याचे उघडकीस आले आहे.

टॅग्स :MalegaonमालेगांवCrime Newsगुन्हेगारी