शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

गणेश आगमन, विसर्जन मिरवणुकीला मनाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 01:14 IST

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नाशिक महापालिकेच्या वतीने गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यंदा गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुकीस मनाई करण्यात आली असून, उत्सव काळात शक्यतो आॅनलाइन दर्शनाच्या सुविधा सार्वजनिक मंडळांनी उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना महापालिकेने केल्या आहेत.

ठळक मुद्देमनपाकडून नियम : ‘आॅनलाइन दर्शन’ उपक्रमाच्या मंडळांना सूचना

नाशिक : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नाशिक महापालिकेच्या वतीने गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यंदा गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुकीस मनाई करण्यात आली असून, उत्सव काळात शक्यतो आॅनलाइन दर्शनाच्या सुविधा सार्वजनिक मंडळांनी उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना महापालिकेने केल्या आहेत.यंदा गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे त्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेच्या वतीने मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. पुढील महिन्यात होणाऱ्या गणेशोत्सवासाठी मंडप उभारणी लवकरच सुरू होणार असून, त्यासाठी महापालिकेच्या वतीने परवानगी देण्यासाठी आॅनलाइन खिडकी सुरू करण्यात आली आहे कुठल्याही परिस्थितीत ज्या गणेश मंडळांनी मंडप उभारण्यासाठी परवानगी घेतली आहे त्यांनाच उत्सव साजरा करता येईल, असे महापालिकेने बजावले आहे. यंदा कोरोनाचे सावट असल्याने गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन महापालिकेने करताना सार्वजनिक गणेश मंडळांना गणेश आगमन आणि विसर्जनाच्या मिरवणुका काढण्यास मनाई केली आहे.गणेशमूर्तीच्या उंचीवरदेखील मर्यादा असून, सार्वजनिक गणेश उत्सवासाठी चार फूट, तर घरगुती गणेश उत्सव दोन फूट उंचीच्या मूर्ती असाव्यात त्याचप्रमाणे शक्यतो पारंपरिक मूर्तींऐवजी धातूच्या किंवा संगमरवरी असाव्यात. मूर्ती शाडूमातीच्या असतील तर घरगुती गणेशमूर्तीचे घरीच विसर्जन करावे. शक्य नसल्यास महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या कृत्रिम तलावात विसर्जन करावे. विसर्जनासाठी येताना नागरिकांनी गर्दी करू नये, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना विसर्जनाच्या ठिकाणी नेऊ नये, असेही महापालिकेने कळविले आहे.विसर्जन पुढच्या वर्षी करा !कोरोना संसर्ग टाळण्यासाठी गणेशमूर्तीचे विसर्जन यंदा अनंत चतुर्दशीच्या दिवशी न करता पुढील वर्षीदेखील करता येणे शक्य असल्याने त्यादृष्टीने विचार करावा. त्याचप्रमाणे माघी गणेशोत्सवाच्या विसर्जन करता येऊ शकते त्यामुळे नागरिकांनी यंदा उत्सवाच्या दहाव्या दिवशी विसर्जन टाळावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.गणेशोत्सव साजरा करताना कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन नियम व अटींचे पालन करीत उत्सव साजरा करावा असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी गणेशोत्सव पूर्व तयारी आढावा बैठकीत केले. कोरोनाचा धोका कायम असल्याने काळजी घेणे अपेक्षित असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाGanesh Festival Ritualsगणेशोत्सव विधी