शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सव ‘भालेकर’वरच व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 23:56 IST

कालिदास कलामंदिरासमोर पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यासाठी संबंधित आठ ते नऊ मंडळांना परवानगी द्यावी यासाठी महापौर रंजना भानसी आग्रही असून, त्यांनी याबाबत आयुक्तांना प्रारंभिक स्तरावर पत्र देण्याचा निर्णय घेतला आहे.

नाशिक : कालिदास कलामंदिरासमोर पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यासाठी संबंधित आठ ते नऊ मंडळांना परवानगी द्यावी यासाठी महापौर रंजना भानसी आग्रही असून, त्यांनी याबाबत आयुक्तांना प्रारंभिक स्तरावर पत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षांनीदेखील यावर टीका केली असून, शिवसेनेने भाजपावर टीका करताना यांच्या कारकिर्दीत गणपती हद्दपार होत असल्याची टीका केली आहे. शहरातील महिंद्रा, बॉशसह अनेक कंपन्या दरवर्षी महापालिकेच्या बी. डी. भालेकर मैदानात गणेशोत्सव साजरा करीत असतात. सध्या याठिकाणी स्मार्ट पार्किंगचे काम सुरू असून, महापालिकेने सदरचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे या मागणीसाठी सुमारे सात ते आठ विविध मंडळांचे पदाधिकारी आयुक्तांना भेटण्यासाठी गेले असता आयुक्तांनी संबंधितांना वाहनतळाच्या जागेत गणेशोत्सव देखावे सादर करण्यास नकार दिला. शिवाय दुरुत्तरे केल्याचा संबंधित पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे. त्यावरून सदरच्या मंडळ पदाधिकाºयांनी बुधवारी (दि. २५) महापौर रंजना भानसी यांच्यासह विविध पदाधिकाºयांच्या भेटी घेतल्या. दरम्यान, महापौर रंजना भानसी यांनीदेखील मंडळांच्या बाजूची भूमिका स्पष्ट केली. वर्षांनुवर्षे त्याठिकाणी गणेशोत्सव साजरा केला जातो आणि आता त्याच ठिकाणी संबंधित मंडळांना परवानगी द्यावी अशी भूमिका मांडतानाच आयुक्त तुकाराम मुंढे यांना पत्र देणार असल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान, यासंदर्भात विरोधी पक्ष नेते अजय बोरस्ते यांनी सत्तारूढ भाजपावरच कोरडे ओढले असून, सत्ताधिकारी आणि प्रशासनाचे डोके ठिकाणावर आहे काय? असा प्रश्न केला आहे. गणेशोत्सव सुरू करणाºया लोकमान्य टिळकांचा वारसा सांगणाºया भाजपाच्या सत्ता कालावधीत गणरायालाच शहराबाहेर हद्दपार केले जात आहे. दरवर्षीप्रमाणेच संबंधित मंडळांना त्याठिकाणी जागा द्यावी अन्यथा शिवसेना स्टाइल उत्तर देण्याचा इशारादेखील बोरस्ते यांनी दिला आहे.तर रस्त्यावरच गणेश प्रतिष्ठापनामनसे गटनेता सलीम शेख यांनी महापालिका प्रशासनाने आडमुठेपणाची भूमिका घेतल्यास रस्त्यावरच गणेश प्रतिष्ठापना करण्याचा इशारा दिला आहे. सामाजिक सलोखा जपण्यासाठी गणेशोत्सव महत्त्वाचा असून, भालेकर मैदानावर दरवर्षीच प्रतिष्ठापना होत असते. त्यात जागेची काही अडचण असेल तर त्याला पर्याय दिला पाहिजे. मुंबई, पुण्यात तर रस्त्यावर मंडप टाकून उत्सव साजरा केला जातो. येथे तर कोणालाही त्रास होणार नाही अशी जागा मागितली आहे. सदरची जागा न दिल्यास मनसे मुख्य रस्त्यावर मंडप टाकून गणरायाची प्रतिष्ठापना करेल व कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी प्रशासनाची असेल, असे त्यांनी पत्रकात म्हटले आहे.तर बहिष्काराचा गणपती..राष्टÑवादी कॉँग्रेस पक्षाच्या वतीने गटनेते गजानन शेलार यांनी गणेशोत्सवासाठी भालेकर मैदानावर जागा देण्यास मनाई करण्याच्या निर्णयाच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली असून, गणेश मंडळांना अशाप्रकारे अडथळे आणल्यास बहिष्काराचा गणपती बसवू असा इशारा दिला आहे.

टॅग्स :Ganpati Utsavगणपती उत्सव