शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

निवडणूक नसल्याने गणेश मंडळांना आर्थिक फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 01:10 IST

परिसरातील गणेशोत्सवाची मंडळाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, यंदा गणेशोत्सव मंडळांना वर्गणीसाठी चांगलीच पायपीट करावी लागत आहे. राजकीय पक्षाचे पदाधिकारी, इच्छुक उमेदवारांकडून वर्गणीसाठी यंदा हात वर करण्यात आल्यामुळे अनेक मंडळांच्या खर्चावर निर्बंध आले असून, आर्थिक तरतुदीनुसारच मंडळांना खर्चाचे नियोजन करावे लागत आहे.

इंदिरानगर : परिसरातील गणेशोत्सवाची मंडळाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, यंदा गणेशोत्सव मंडळांना वर्गणीसाठी चांगलीच पायपीट करावी लागत आहे. राजकीय पक्षाचे पदाधिकारी, इच्छुक उमेदवारांकडून वर्गणीसाठी यंदा हात वर करण्यात आल्यामुळे अनेक मंडळांच्या खर्चावर निर्बंध आले असून, आर्थिक तरतुदीनुसारच मंडळांना खर्चाचे नियोजन करावे लागत आहे.  दरवर्षी पारंपरिक उत्साहात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवावर यंदा जाचक नियमावलीचे विघ्न आले असून, रस्ता रुंदीचे नियम आणि खड्डे खणण्यास मज्जाव करण्यात आल्यामुळे मंडळांना उत्सव साजरा करणे कठीण झाले आहे. त्यामुळे बहुतेक मंडळांनी मोकळ्या भूखंडाचा शोध घेऊन त्यावरच गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे जमिनीचे सपाटीकरण व पावसामुळे चिखल होऊ नये म्हणून खडी टाकण्यात येत आहे. श्रींच्या आगमनाच्या दिवशी मिरवणुकीसाठी वाद्याचे आगाऊ पैसे देऊन नोंदणी करण्यात येत आहे. विद्युत रोषणाई आणि देखावा सजावटीवरही अंतिम हात फिरवण्यात येत आहे. यंदाच्या वर्षी प्लॅस्टिकमुक्त, स्वच्छ परिसर, पाण्याची बचत यांसह विविध समाज प्रबोधन देखाव्यावर भर देण्यात आल्याचे दिसून येत आहे.  युनिक ग्रुपच्या शहरातील सर्वांत मोठा गणेश उत्सव म्हणून बघितले जाते वतीने ८४ बाय ४०चा वॉटरप्रूफ डोम उभारण्यात आला असून, त्यामध्ये डिजिटल देखावा आणि एलइडी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येत आहे. सीसीटीव्ही कॅमेºयाची नजर राहणार असल्याचे ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक सतीश सोनवणे यांनी सांगितले.द्वारकामाई मित्रमंडळ, विनयनगर मित्रमंडळ, स्वा. सावरकर मित्रमंडळ, श्रीकृष्ण मित्रमंडळ, अरुणोदय मित्रमंडळ आदी मंडळांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.  श्री प्रतिष्ठानच्या वतीने वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील श्री गजानन मंदिरासमोरील मैदानावर बंगाली मंदिर उभारण्याचे काम बंगाल येथून आलेले सुमारे वीस कारागीर दिवस आणि रात्र बांबू लाकूड आणि कापड याद्वारे पर्यावरणपूरक असे बंगाली टेम्पल उभारत आहेत. सदर मंदिराची उंची ६० आणि रुंदी ८० फूट आहे.  - श्याम बडोदे,  प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवganpatiगणपती