शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक नसल्याने नाशिकमध्ये गणेश मंडळांना आर्थिक फटका

By श्याम बागुल | Updated: September 10, 2018 18:33 IST

दरवर्षी पारंपरिक उत्साहात साजरा होणा-या गणेशोत्सवावर यंदा जाचक नियमावलीचे विघ्न आले असून, रस्ता रुंदीचे नियम आणि खड्डे खणण्यास मज्जाव करण्यात आल्यामुळे मंडळांना उत्सव साजरा करणे कठीण झाले आहे. त्यामुळे बहुतेक मंडळांनी मोकळ्या भूखंडाचा शोध घेऊन त्यावरच गणेशोत्सव

ठळक मुद्देइंदिरानगर : वर्गणी गोळा करण्यासाठी पदाधिकाऱ्यांची धावाधावपक्षाचे पदाधिकारी, इच्छुक उमेदवारांकडून वर्गणीसाठी यंदा हात

नाशिक : परिसरातील गणेशोत्सवाची मंडळाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, यंदा गणेशोत्सव मंडळांना वर्गणीसाठी चांगलीच पायपीट करावी लागत आहे. राजकीय पक्षाचे पदाधिकारी, इच्छुक उमेदवारांकडून वर्गणीसाठी यंदा हात वर करण्यात आल्यामुळे अनेक मंडळांच्या खर्चावर निर्बंध आले असून, आर्थिक तरतुदीनुसारच मंडळांना खर्चाचे नियोजन करावे लागत आहे.दरवर्षी पारंपरिक उत्साहात साजरा होणा-या गणेशोत्सवावर यंदा जाचक नियमावलीचे विघ्न आले असून, रस्ता रुंदीचे नियम आणि खड्डे खणण्यास मज्जाव करण्यात आल्यामुळे मंडळांना उत्सव साजरा करणे कठीण झाले आहे. त्यामुळे बहुतेक मंडळांनी मोकळ्या भूखंडाचा शोध घेऊन त्यावरच गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे जमिनीचे सपाटीकरण व पावसामुळे चिखल होऊ नये म्हणून खडी टाकण्यात येत आहे. श्रींच्या आगमनाच्या दिवशी मिरवणुकीसाठी वाद्याचे आगाऊ पैसे देऊन नोंदणी करण्यात येत आहे. विद्युत रोषणाई आणि देखावा सजावटीवरही अंतिम हात फिरवण्यात येत आहे. यंदाच्या वर्षी प्लॅस्टिकमुक्त, स्वच्छ परिसर, पाण्याची बचत यांसह विविध समाज प्रबोधन देखाव्यावर भर देण्यात आल्याचे दिसून येत आहे.युनिक ग्रुपच्या शहरातील सर्वांत मोठा गणेश उत्सव म्हणून बघितले जाते वतीने ८४ बाय ४०चा वॉटरप्रूफ डोम उभारण्यात आला असून, त्यामध्ये डिजिटल देखावा आणि एलइडी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येत आहे. मैदानावर सीसीटीव्ही कॅमेºयाची नजर राहणार असल्याचे ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक सतीश सोनवणे यांनी सांगितले, तर श्री प्रतिष्ठानच्या वतीने वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील श्री गजानन मंदिरासमोरील मैदानावर बंगाली मंदिर उभारण्याचे काम बंगाल येथून आलेले सुमारे वीस कारागीर दिवस आणि रात्र बांबू लाकूड आणि कापड याद्वारे पर्यावरणपूरक असे बंगाली टेम्पल उभारत आहेत. सदर मंदिराची उंची ६० आणि रुंदी ८० फूट आहे, असे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्याम बडोदे यांनी सांगितले. अजय मित्रमंडळच्या वतीने सालाबादाप्रमाणे यंदाही श्री गणरायाच्या आगमनासाठी मिरवणुकीसाठी ढोल वाजवण्याची सराव मंडळाच्या मैदानावर सुरू असल्याचे मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सचिन कुलकर्णी यांनी सांगितले. द्वारकामाई मित्रमंडळ, विनयनगर मित्रमंडळ, स्वा. वि. दा. सावरकर मित्रमंडळ, श्रीकृष्ण मित्रमंडळ, अरुणोदय मित्रमंडळ आदी मंडळांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

 

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवNashikनाशिक