शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

गांधी विचार आणि धनगर समाज जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 00:55 IST

महानिर्मिती राज्य नाट्य स्पर्धा  नाशिक : महाकवी कालिदास कलामंदिर येथे औष्णिक विद्युत केंद्रातर्फे सुरु असलेल्या महानिर्मिती कंपनीच्या आंतर विद्युत ...

महानिर्मिती राज्य नाट्य स्पर्धा नाशिक : महाकवी कालिदास कलामंदिर येथे औष्णिक विद्युत केंद्रातर्फे सुरु असलेल्या महानिर्मिती कंपनीच्या आंतर विद्युत केंद्र नाट्य स्पर्धेत मंगळवारी (दि.२७)सकाळी गांधी विचारांवर आधारित ‘४७ एके ४७’ व दुपाच्या सत्रात ‘दि गेम आॅफ डेस्टीनी’नाटकांचे सादरीकरण झाले. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी प्रेक्षकांचा प्रतिसाद घटल्याचे दिसून आले असले तरी कलाकारांनी मात्र पूर्ण क्षमतेने सादरीकरण करीत परीक्षकांसह उपस्थितांची दाद मिळवली.महानिर्मिती कंपनीच्या आंतर विद्युत केंद्र नाट्य स्पर्धेत सकाळच्या सत्रात नागपूरच्या खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राने संजय पवार लिखित ‘४७ एके ४७‘ नाटकाचे सादर केले. यातून गांधीवाद आणि हिंदुत्ववाद यातील वैचारिक मतभेदांवर प्रकाशझोत टाकताना गांधीवादी विचार शांती आणि अहिसंक मार्गानेही हिंसक प्रवृत्तींचा पडाव करू शकतात याचे सादरीकरण करण्यात आले. नाटकात दिग्दर्शक भास्कर शेगोकार यांनी प्रमूख भूमिका साकारली असून, त्यांच्यासह प्रसाद चौधरी, महेंद्र राऊत, प्राची दाणी, विकास अरसपुरे, अमर महल्के, संतोष पाटील, मानसिंग कोकणी यांनी कसदार अभिनय केला आहे. नेपथ्य विजय मोहाड, संगीत संकेत येळेगावकर, प्रकाशयोजना मारुती भोज व वेशभूषा भूषण दाणी यांनी केली आहे. दुपारच्या सत्रात पोफळी येथील कोयना जलविद्युत केंद्रातर्फे अमोल रेडीज लिखित ‘दि गेम आॅफ डेस्टिनी’ नाटकातून दिग्दर्शक मंगेश डोंगरे यांनी धनगर समाजाचे जीवनमान रंगमंचावर दाखवताना त्यांच्यातील माणुसकी या नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. एकाच वेळी २५ कलाकारांकडून सादरीकरणाचा मेळ बसवितांना दिग्दर्शकाला चांगलीच कसरत करावी लागली. या नाटकात विक्रांत जिरंगे, विश्वास कांबळे, प्रमोद बोडरे, सत्ताप्पा राणे, रामा भगत, संतोश डांगरे, दिलीप जाधव, मल्लेष कांबळे, उदय भोसले, मंगेश डोंगरे, पूजा गवळी, मोनिका जिरंगे, अनुजा मोट यांनी लक्षणीय अभिनय केला. मुख्य अभियंता आर. व्ही. तासकर यांची निर्मिती असलेल्या नाटकाचे नेपथ्य उदय भोसले व दिलीप जाधव, प्रकाषयोजना उदय पोटे व उमेष हिवरे, संगीत अजित मोटे व अभिजीत सांळुखे तसेच रंगभुषा व वेशभुषा मंगेश डोंगरे यांनी केली आहे.दुपारच्या सत्रात पोफळी येथील कोयना जलविद्युत केंद्रातर्फे अमोल रेडीज लिखित‘दि गेम आॅफ डेस्टिनी’  नाटकातून दिग्दर्शक मंगेश डोंगरे यांनी धनगर समाजाचे जीवनमान रंगमंचावर दाखवताना त्यांच्यातील माणुसकी या नाटकाच्या माध्यामातून प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashikनाशिक