शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये चार कोटींना ‘गंडा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 00:16 IST

नाशिक : लॉकडाऊन काळात नाशिककरांनी सुमारे चार कोटी सहा लाख ९२ हजार रुपये इतकी मोठी रक्कम आॅनलाइन फसवणुकीत गमावली आहे. सायबर गुन्हेगारांनी विविध क्लृप्त्या लढवत विविध आमिष दाखवून बनावट पद्धतीने गुगल पे, फोन पे कोड स्कॅनिंगद्वारे तसेच परस्पर बँक खात्याचा अ‍ॅक्सेस मिळवून सुमारे १६ ते १७ घटनांमध्ये नागरिकांना हजारो ते लाखो रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. सर्वाधिक दहा घटना मार्चमध्ये घडल्याची नोंद सायबर पोलीस ठाण्यात आहे.

ठळक मुद्देआॅनलाइन फ्रॉड : डेबिट, क्रे डिट कार्डची माहिती घेत फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : लॉकडाऊन काळात नाशिककरांनी सुमारे चार कोटी सहा लाख ९२ हजार रुपये इतकी मोठी रक्कम आॅनलाइन फसवणुकीत गमावली आहे. सायबर गुन्हेगारांनी विविध क्लृप्त्या लढवत विविध आमिष दाखवून बनावट पद्धतीने गुगल पे, फोन पे कोड स्कॅनिंगद्वारे तसेच परस्पर बँक खात्याचा अ‍ॅक्सेस मिळवून सुमारे १६ ते १७ घटनांमध्ये नागरिकांना हजारो ते लाखो रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. सर्वाधिक दहा घटना मार्चमध्ये घडल्याची नोंद सायबर पोलीस ठाण्यात आहे.लॉकडाऊन काळात शहरात ३ मार्चपासून सातत्याने एकापाठोपाठ सायबर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले. एका गुन्ह्यात अनोळखी सायबर गुन्हेगाराने चक्क एका महिलेला अश्लील फोटो पाठवून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत सुमारे २६ हजार रुपये उकळल्याचाही धक्कादायक प्रकार ७ मार्च रोजी उघडकीस आला होता.अंबड पोलीस ठाण्यात २४ मार्च रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यात फिर्यादीची तब्बल ११ लाख ८६ हजार रुपयांची फसवणूक सायबर गुन्हेगाराकडून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. काही गुन्ह्यांमध्ये परराज्यातील गुन्हेगारांनी शहरातील नागरिकांच्या बॅँक खात्यातून परस्पर पैसे काढल्याच्या देखील घटना घडल्या आहेत. आॅनलाइन बॅँकिंगचा वापर हा सतर्कतेने करायला हवा. आॅनलाइन आर्थिक फसवणुकीचा आकडा वाढत आहे. नागरिकांनी सावध होणे गरजेचे आहे. झारखंड, राजस्थान, बिहार या तीन राज्यांमधून सध्या सायबर चोरट्यांनी नाशिककडे लक्ष केंद्रित केल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.- देवराज बोरसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणेमागील वर्षी साडेसातशे नाशिककरांची सायबर चोरट्यांनी आर्थिक फसवणूक करत कोट्यवधींची रक्कम लुटली होती. यावर्षी हा आकडा अधिकच गंभीर होण्याची चिन्हे आहे. या सहा महिन्यांमध्ये सुमारे चारशे नागरिकांना आर्थिक फसवणुकीचा सामना करावा लागल्याचे सायबर पोलीस सांगतात.लॉकडाऊनच्या काळातही सायबर क्राइम घटनांमध्ये वाढ झाली होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीcorona virusकोरोना वायरस बातम्या