शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सटाणा नगरपालिकेच्या घंटागाड्यांचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 16:53 IST

घनकचरा व्यवस्थापन : भाजपा नगरसेवकांचा बहिष्कार

ठळक मुद्दे नव्याने दाखल झालेल्या घंटा गाड्यांमुळे शहरातील घाण व कचरा उचलण्यासाठी मोठी मदत होणार असून या गाड्या शहरातील विविध प्रभागांमध्ये फिरतांना ध्वनीक्षेपकावर नागरिकांना वर्दी देत कचरा टाकण्याचे आवाहन करतील

सटाणा : येथील नगरपालिकेच्यावतीने घनकचरा व्यवस्थापनासाठी सहा नव्या घंटागाड्यांचे लोकार्पण शुक्रवारी (दि.१४) नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान, भाजपाच्या नगरसेवकांनी या कार्यक्रमावर बहिष्कार घालत नगराध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर टीका केली.शहराचा वाढता विस्तार पाहता उपलब्ध असलेल्या घंटागाड्यांची संख्या तोकडी होती. नगराध्यक्ष सुनील मोरे,आरोग्य सभापती दीपक पाकळे यांचेसह नगरसेवकांनी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतर अखेर सहा नव्या घंटा गाड्या सटाणा नगर परिषदेसाठी उपलब्ध झाल्या. नव्याने दाखल झालेल्या घंटा गाड्यांमुळे शहरातील घाण व कचरा उचलण्यासाठी मोठी मदत होणार असून या गाड्या शहरातील विविध प्रभागांमध्ये फिरतांना ध्वनीक्षेपकावर नागरिकांना वर्दी देत कचरा टाकण्याचे आवाहन करतील.यावेळी उपनगराध्यक्ष संगिता देवरे, गटनेते दिनकर सोनवणे, काका सोनवणे, राहुल पाटील, राकेश खैरनार, सभापती शमा मन्सुरी, नगरसेविका डॉ.विद्या सोनवणे, निर्मला भदाणे, भारती सुर्यवंशी, सुवर्णा नंदाळे, सामाजिक कार्यकर्ते नाना मोरकर,दत्तुभाऊ बैताडे, दीपक जापानी,शालीमार कोर, अरिफ मन्सुरी आदी उपस्थित होते.भाजपाचे टीकास्त्रघंटागाड्या लोकार्पण कार्यक्र माला भाजपचे गटनेते महेश देवरे, नगरसेवक मुन्ना शेख , पुष्पा सूर्यवंशी , मनोहर देवरे यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. याबाबत महेश देवरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण व आपल्या सहकारी नगरसेवकांनी कार्यक्र मावर बहिष्कार टाकल्याचे स्पष्ट करत नगराध्यक्ष कोणत्याही कामात आम्हाला विश्वात घेत नसल्याने नाराजी व्यक्त केली. घंटागाड्या कोणत्या पद्धतीने खरेदी केल्यात याची देखील आम्हाला माहिती दिली गेली नाही. याची सखोल चौकशी करू ,असेही देवरे यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :Nashikनाशिक